खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो (Oppo) ने कस्टमाइज्ड ऑपरेटिंग सिस्टम (OS) कलर ओएस 11 सादर केला आहे. कलर ओएस 11, एंडरॉयड 11 (android 11 Operating system) ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. ओपो ने “मेक लाइफ फ्लो” कॉन्सेप्ट सह ColorOS 11 सादर केला आहे. ColorOS 11 यूआई मध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले, थीम आणि वॉलपेपर सोबतच फॉन्ट, आयकॉन आणि रिंगटोन मध्ये अनेक बदल दिसतील.

या फोन्सना मिळेल अपडेट

COLORS OS 11 च्या अपडेटची सुरवात Find X2 Series आणि Reno 3 सीरीज पासून होईल, तसेच Find, Reno, F, K आणि A सीरीजच्या 28 पेक्षा जास्त मॉडेल्सना पण हा अपडेट मिळेल. लिस्टनुसार Oppo Find X2, Find X2 Pro आणि Find X2 Pro Automobili Lamborghini Edition ला 14 सप्टेंबर पासून अपडेट मिळण्यास सुरवात होईल. Reno 3 4G, Reno 3 Pro 4G आणि Oppo F17 Pro 30 ला सप्टेंबर पासून अपडेट मिळण्यास सुरवात होईल. बाकिच्या फोन्सची यादी पुढे दिलेल्या फोटो मध्ये आहे.

ColorOS 11 चे टॉप फीचर्स

थ्री-फिंगर ट्रांसलेशन: ColorOS 11 मध्ये Google Lens चा सपोर्ट आहे जो येतो थ्री-फिंगर ट्रांसलेशन सह. या फीचरच्या मदतीने तुम्ही तीन-बोटांच्या जेस्चरच्या मदतीने स्क्रीनशॉट मधील टेक्स्ट कॉपी करून ट्रांसलेशन करू शकता.

फ्लेक्स ड्रॉप फीचर: हा एक मल्टी-टास्किंग फीचर आहे ज्याच्या मदतीने यूजर एकाच वेळी वीडियो आणि टेक्स्ट बघू शकतात. हा फीचर गेमर्स आणि वीडियो बघणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

बॅटरी सेवचा ऑप्शन: बॅटरी जास्त वापरण्यासाठी नवीन सुपर पावर सेविंग मोडचा पर्याय आला आहे. नवीन अपडेट मध्ये यूजर्सना कमी बॅटरी झाल्यावर सहा ऍप निवडण्याच्या पर्याय मिळतो.

सिक्योरिटी: Coloros 11 मध्ये एंडरॉयड 11 चे सर्व सिक्योरिटी आणि प्राइवेसी फीचर्स मिळतात. नवीन अपडेट मध्ये यूजर्सना प्राइवेट सिस्टम बनवण्याची संधी मिळेल ज्यात ऍप आणि डेटाचा सेकंड वर्जन बनवता येतो आणि तो वेगळ्या फिंगरप्रिंट स्कॅन किंवा पासवर्डच्या माध्यमातून उघडता येतो.

बॅटरी कमी झाल्यावर मिळेल नोटिफिकेशन: हा फीचर तुमच्या फोनची बॅटरी लो झाल्यावर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नोटिफिकेशन पाठवतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांना समजते कि तुमच्या फोनची बॅटरी लो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here