ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या फॅब फोन फेस्ट सेल सुरु आहे. हा सेल 23 डिसेंबरला सुरु झाला असून 31 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्यात जात आहेत. सेल दरम्यान शानदार सेल्फी कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8GB रॅम, 64MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मिळणारा डिस्काउंट, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.
डिस्काउंटसह OPPO F21s Pro उपलब्ध
OPPO F21s Pro स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल सध्या फॅब फेस्ट सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची एमआरपी 27,999 रुपये आहे, अर्थात या फोनवर 21 टक्क्यांची थेट सूट मिळत आहे. तसेच 700 रुपयांच्या कुपन डिस्काउंट आणि 2000 रुपयांच्या बँक डिस्काउंटनंतर हा हँडसेट 19,299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: काही मिनिटांत चार्जिंग फुल! 100W फास्ट चार्जिंगसह येतोय OnePlus Ace 2; जाणून घ्या संपूर्ण माहिती
OPPO F21s Pro स्मार्टफोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे तसेच अॅमेझॉनकडून 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील दिला जात आहे. जर तुम्ही मासिक हप्त्यांवर हा हँडसेट विकत घेण्याचा विचार करत असाल तर ईएमआय 1051 रुपयांपासून सुरु होतात. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.
OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेन्स
- 6.4-इंच FHD+ 90Hz AMOLED पॅनल
- 64MP+ 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 32MP सेल्फी कॅमेरा
- Android 12 आधारित ColorOS 12.1 ओएस
- Qualcomm Snapdragon 680 4G
- 4,500mAh बॅटरी, 33W SuperVooc चार्जिंग
- 8GB RAM आणि 128GB स्टोरेज
OPPO F21s Pro 4G फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहेत. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: 26 हजारांच्या आत आला रेडमीचा दणकट फोन; Redmi K60, Redmi K60E वाढवणार वनप्लसचं टेंशन
OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा सोनी सेन्सर आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर – मायक्रोस्कोप आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.
