8GB रॅमसह Redmi K60 आणि Redmi K60E चीनमध्ये सादर

शाओमीनं चीनमध्ये Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेल क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जेन2 सह सादर करण्यात आला आहे. परंतु त्यापेक्षा कमी किंमतीत येऊन देखील Redmi K60 आणि Redmi K60E मध्ये 16GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट आणि फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर देण्यात आले आहेत. पुढे आम्ही या सीरिजमधील Redmi K60 आणि Redmi K60E स्मार्टफोनची सर्व माहिती दिली आहे.

Redmi K60, Redmi K60E Price

Redmi K60 स्मार्टफोनची किंमत 2,499 युआन (सुमारे 29,800 रुपये) पासून सुरु होते, ही किंमत फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची आहे. तर 2699 युआन (सुमारे 32,200 रुपये) मध्ये 8GB + 256GB मॉडेल, 2,999 युआन (सुमारे 35,700 रुपये) मध्ये 12GB + 256GB व्हेरिएंट, 3299 युआन (सुमारे 39,300 रुपये) मध्ये 12GB + 512GB मॉडेल आणि 3,599 युआन (सुमारे 42,900 रुपये) मध्ये 16GB + 512GB व्हर्जन मिळेल.

छोट्या Redmi K60E च्या बेस मॉडेलची किंमत 2,199 युआन (सुमारे 26,200 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. तर 2,399 युआन (सुमारे 28,600 रुपये) 8GB + 256GB व्हेरिएंट, 2599 युआन (सुमारे 31,000 सुमारे) 12GB + 256GB मॉडेल आणि 2,799 युआन (सुमारे 33,400 रुपये) 12GB + 512GB व्हर्जनसाठी मोजावे लागतील. हे देखील वाचा: कमी किंमतीत वरच्या दर्जाचे फिचर देणारा Redmi K60 Pro लाँच; जाणून घ्या स्पेशल फीचर्स

Redmi K60 Specifications

  • 6.67-inch 2K 120Hz AMOLED Display
  • Snapdragon 8+ Gen1 Chipset
  • 16GB RAM, 512GB Storage and MIUI 14
  • 5500mAh Battery
  • 67W Fast Charging, 30W Wireless Charging
  • 64MP OIS Triple Camera

Redmi K60 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3200 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1400nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच ही पंच होल डिजाईन असलेली स्क्रीन 12 बिट पी3-कलर गामुट, डॉल्बी व्हिजन, 1920Hz पीडब्लूएएम डीमींग, HDR10+ आणि JNCD प्रोटेक्शन लेयरसह येते.

Redmi K60 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी Adreno GPU आहे. हा फोन 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. रेडमीनं हा स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 सह सादर केला आहे.

Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर मिळतो. तर कनेक्टव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi K60 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एफ 1.79 अपर्चर आणि ओआयएस सपोर्ट आलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ही एक 6P लेन्स आहे. जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Redmi K60E Specifications

  • 6.67-inch 2K 120Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 8200 SoC
  • 12GB RAM, 256GB Storage and MIUI 14
  • 5500mAh Battery
  • 67W Fast Charging
  • 48MP OIS Triple Camera
  • Redmi K60E या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, जो 6.7-इंचाच्या 2K अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ही पंच होल स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट, 1920Hz पीडब्ल्यूएम डीमींग, HDR10+ आणि गोरल ग्लास विक्ट्सला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तसेच फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर देखील आहे. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

    या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 8200 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्टचा पर्याय देण्यात आला आहे. फोनमधील 5500mAh ची दमदार बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

    Redmi K60E मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा Sony IMX582 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16MP चा सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here