100W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो OnePlus Ace 2

गेल्यावर्षीपासून चिनी स्मार्टफोन ब्रँड वनप्लसनं आपली नवीन ‘एस’ सीरिज सादर करण्यास सुरुवात केली आहे. आता या सीरिजचा दुसरा स्मार्टफोन OnePlus Ace 2 लवकरच बाजरात येऊ शकतो अशी बातमी आली आहे. या मोबाइल फोनची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरु आहे परंतु आता मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर हा स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. वनप्लस एस 2 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 100W fast charging सारखे फीचर्स असू शकतात, ज्यांची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • Curved AMOLED डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • 50MP Camera
  • 100W fast charging
  • 5,000mAh battery

वनप्लस एस 2 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला प्रोसेसर आहे जो ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 सह लाँच केला जाऊ शकतो. आधी आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

OnePlus Ace 2 च्या नवीन लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन अ‍ॅमोलेड पॅनल स्क्रीनसह येईल जो कर्व्ड पॅनलवर बनलेला असू शकतो. नवीन लीकमध्ये स्क्रीन साईज सांगण्यात आली नाही परंतु आधीच्या माहितीनुसार यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो 1.5के रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वनप्लस एस 2 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच लीक्सनुसार हा फोन 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल थर्ड सेन्सरला सपोर्ट करू शकते. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी मिळू शकतो.

OnePlus Ace 2 5,000एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. मोठ्या बॅटरी सोबतच या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हा मोबाइल फोन मार्केटमध्ये कधी येईल याची मात्र ठोस माहिती अद्याप समजली नाही. हे देखील वाचा: 150KM रेंजसह आली क्यूट लुक Electric Car; 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here