17 जूनला भारतात येत आहेत स्टाइलिश डिजाइन असलेले Oppo Find X2 आणि X2 Pro, OnePlus ला मिळेल टक्कर

OPPO आपली ‘फाइंड एक्स’ सीरीज भारतात वाढवत Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे. इनवाइटनुसार भारतात फाइंड एक्स2 सीरीज 17 जूनला लॉन्च केली जाईल. देशात कोरोना वायरसची भीती आहे, ज्यामुळे कंपनी हा डिवाइस ऑनलाइन इवेंट द्वारे सादर केला जाईल. हि सीरीज कंपनीने आधीच ग्लोबली लॉन्च केली आहे. तसेच OPPO च्या घोषणेच्या आधी फाइंड एक्स2 ची भारतीय किंमत शॉपिंग साइट अमेझॉन वर समोर आला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Oppo Find X2 अमेझॉन इंडिया वर दिसला होता. तसेच एका वेबसाइटला अमेझॉनच्या बॅकएंड डेटा मध्ये फोनच्या किंमतीची माहिती मिळाली होती. त्यानुसार Oppo फाइंड एक्स2 चा 12 जीबी रॅम व 256 जीबी मेमरी वेरिएंट 69,999 रुपयांमध्ये लिस्ट केला गेला होता. अधिकृतपणे फोनची किंमत 17 जूनला समोर येईल.

OPPO Find X2 चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो फाइंड एक्स2 मध्ये 6.7-इंचाचा एमोलेड डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 असलेला पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. एंडरॉयड 10 सह या फोन मध्ये पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 12GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज वाढवता येत नाही. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी सुपर फास्ट 65 वॉट चार्जिंग आउटपुट सपोर्ट असलेली 4,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट पण आहे.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर याच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मागे असलेल्या कॅमेरा सिस्टम मध्ये एक 48MP वाइड अँगल कॅमेरा सोनी IMX586 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/1.7 आहे. तसेच अल्ट्रा नाइट मोड 3.0 12MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सोनि IMX708 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तसेच फोन मध्ये 13MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. फ्रँटला वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

OPPO Find X2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

फाइंड एक्स 2 प्रो पाहता कंपनीने हा 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 3168 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या क्यूएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो जो NSA/SA Dual Mode 5G सह येतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सोबतच हा फोन 65W SuperVOOC 2.0 Flash Charge टेक्नॉलॉजी असलेल्या 4,260एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Find X2 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अर्पचर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX689 सेंसर देण्यात आलेला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अर्पचर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX586 अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि एफ/3.0 अर्पचर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या पेरिस्कोप टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी ओपो फाइंड एक्स2 प्रो मध्ये एफ/2.4 अर्पचर असलेला 32 मेगापिक्सलचा Sony IMX616 सेंसर देण्यात आलेला आहे.

ओपो फाइंड एक्स2 प्रो वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here