स्वस्त स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेक ब्रँड Infinix ने आपला नवीन मोबाईल फोन Infinix Smart 9 जागतिक बाजारपेठेत सादर केला आहे. हा लो बजेट डिव्हाईस सर्वप्रथम मलेशियामध्ये लाँच झाला आहे जो नंतर इतर मार्केटमध्ये उपलब्ध होईल. तुम्ही स्वस्त Infinix स्मार्टफोन Smart 9 ची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दलची अधिक माहिती पुढे वाचू शकता आणि त्याचे फोटो देखील पाहू शकता.
Infinix Smart 9 ची किंमत
Infinix Smart 9 ची किंमत मलेशियामध्ये 299 मलेशियन रिंगिट पासून सुरू होते. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे 6,200 रुपये आहे. या दरात Infinix Smart 9 चे 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळत आहे. मलेशियन मार्केटमध्ये या फोनला ब्लॅक, मिंट ग्रीन, गोल्ड आणि सिल्व्हर रंगांमध्ये खरेदी करता येईल. Infinix आपल्या नव्या मोबाईलला भारतात कधी लाँच करेल याबाबत अजून ठोस काहीही सांगता येत नाही.

Infinix Smart 9 चे स्पेसिफिकेशन
- 6.7″ एचडी+ 120 हर्ट्स एलसीडी स्क्रीन
- मीडियाटेक हेलिओ जी 81
- 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
- 13 एमपी बॅक कॅमेरा
- 8 एमपी फ्रंट कॅमेरा
- 10 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
स्क्रीन
Infinix Smart 9 मध्ये 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. पंच-होल स्टाईल असणाऱ्या या स्क्रीनमध्ये आयपीएस एलसीडी पॅनेलचा वापर केला आहे आणि त्याची स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.2% आहे. Infinix Smart 9 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 500 निट्स ब्राईटनेसचा सपोर्ट मिळत आहे.
प्रोसेसर
Infinix Smart 9 ला मीडियाटेक च्या हेलिओ जी81 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केले गेले आहे. या 8-कोर सीपीयू मध्ये 2.0 गिगाहर्ट्स क्लॉक स्पीड असलेले 2 कॉर्टेक्स-ए 75 कोर आणि 1.7 गिगाहर्ट्स क्लॉक स्पीड असलेले 6 कॉर्टेक्स-ए55 कोर दिले गेले आहेत. ग्राफिक्ससाठी हा Infinix स्मार्टफोन एआयएम माली-जी52 एमसी2 जीपीयू ला सपोर्ट करत आहे.
ऑपरेटिंग सिस्टम
Infinix Smart 9 हा अँड्राईड 14 गो ॲडिशन वर लाँच झाला आहे. अँड्रॉइड गो असल्याने या मोबाईलमध्ये गुगल गो ॲप्सला डाऊनलोड आणि इन्स्टॉल करता येऊ शकतात. लक्षात घेण्यासारखे आहे की हे ॲप्स फोनमध्ये कमी स्टोरेज व्यापतात आणि वापरादरम्यान इंटरनेट आणि बॅटरीचा वापर देखील कमी करतात. अँड्रॉईड गो फोन लाईट प्रोसेसर आणि कमी रॅमवरही हँग न होता स्थुथ प्रोसेस करू शकतात.
मेमरी
मलेशियामध्ये या स्मार्टफोनला दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. Infinix Smart 9 3 जीबी आणि 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. ही LPDDR4X रॅम आहे. हे दोन्ही मॉडेल व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. 3 जीबी व्हेरिएंटमध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 4 जीबी व्हेरिएंटमध्ये 4 जीबी व्हर्च्युअल रॅम जोडली जाऊ शकते, जी त्याला 6 जीबी आणि 8 जीबी रॅमची शक्ती देते. या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये अनुक्रमे 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज दिले गेले आहे आणि दोन्हीमध्ये 2 टीबी मेमरी कार्ड लावले जाऊ शकते.
कॅमेरा
Infinix Smart 9 मध्ये फोटोग्राफीसाठी मागील पॅनलवर एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला गेला आहे, जो ड्युअल एलईडी फ्लॅशने सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Infinix Smart 9 च्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चर सह काम करतो.
बॅटरी
पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 9 ला 5,000 एमएएच च्या बॅटरीने सुसज्ज करून बाजारात आणले आहे. कंपनीने दावा केला आहे की पूर्ण चार्ज केल्यानंतर 34 दिवसांचा स्टँडबाय टाईम देण्याची क्षमता ठेवत आहे. तर पूर्ण चार्ज केल्यानंतर फोनवर 9.8 तास मोबाईल गेमिंग करता येऊ शकते. फोन बॅटरी चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप सी पोर्ट आणि 10 वॉट चार्जिंग तंत्रज्ञान दिले गेले आहे.
इतर फिचर्स
Infinix Smart 9 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे ज्यासोबत एफएम रेडिओ देखील मिळत आहे. यात ड्युअल स्पीकर आणि 300% व्हॉल्यूम प्लस फिचर देखील उपलब्ध आहे. मोबाईलला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी यामध्ये IP54 सर्टिफिकेशन मिळत आहे. हा Infinix स्मार्टफोन ओटीजी ला देखील सपोर्ट करतो, ज्याद्वारे मोबाईलमध्ये यूएसबी पेन ड्राईव्ह, किबोर्ड, माऊस सारखी इतर डिव्हाईस देखील कनेक्ट करता येऊ शकतात.















