108MP कॅमेरा, 120W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला Redmi K50 Ultra, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi K50 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. शाओमीनं हा स्मार्टफोन चीनमध्ये MIX Fold 2 आणि Xiaomi Pad 5 Pro टॅबलेटसह सादर केला आहे. शाओमीचा हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये व्हेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. Redmi K50 Ultra स्मार्टफोनच्या मागे रग्ड फिनिश देण्यात आली आहे. रेडमीच्या फोनमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा आणि 20MP Sony IMX566 सेल्फी कॅमेरा, 120W फास्ट चार्जिंग आणि Android 12 OS आहे.

Redmi K50 Ultra स्पेसिफिकेशन्स

  • 6.67-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर
  • 12GB RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज
  • Android 12 OS
  • 108MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 20MP फ्रंट कॅमेरा

Redmi K50 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 480Hz, HDR10+ आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. रेडमीचा हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU सह येतो. रेडमीचा हा फोन 8GB LPDDR5 RAM सह 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेज आणि 12GB LPDDR5 RAM सह 256GB/512GB 3.1 स्टोरेजसह येतो.

Redmi K50 Ultra स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS (L1 + L5), NavIC, USB Type-C, आणि NFC ऑप्शन मिळतात. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इंफ्रारेड सेन्सर, USB Type-C, Hi-Res audio, Dolby Atmos, आणि ड्युअल स्पिकरला सपोर्ट करतो.

Redmi K50 Ultra फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP Samsung HM6 सेन्सर आहे जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतो. जोडीला LED फ्लॅश, 8MP UW सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 20MP Sony IMX596 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे.

Redmi K50 Ultra ची किंमत

Redmi K50 Ultra चा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह RMB 2,999 (सुमारे 35,400 रुपये) च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB + 256GB स्टोरेजसह RMB 3,299 (सुमारे 39,000 रुपये) च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनचा तिसरा व्हेरिएंट 12GB + 256GB सह RMB 3,599 (सुमारे 42,450 रुपये) आणि चौथा व्हेरिएंट 12GB रॅम + 512GB स्टोरेजसह RMB 3,999 (सुमारे 47,200 रुपये) च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे.

Redmi K50 Ultra स्मार्टफोनचा स्पेशल Mercedes-AMG PETRONAS Formula One Team Summer एडिशन स्मार्टफोन देखील सादर करण्यात आला आहे. हा फोन 12GB + 512GB व्हेरिएंटसह RMB 4,199 (सुमारे 49,600 रुपये) च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. रेडमीचा हा फोन चीनमध्ये 16 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here