Vivo Y300+ ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी लीक, लवकर होऊ शकते एंट्री

विवो भारतीय बाजारात आपली Y300 सीरीज आणण्याची तयारी करत आहे. यानुसार अगामी Vivo Y300+ मॉडेल भारतीय बाजारात लवकर येण्याची संभावना आहे. परंतु अजून ब्रँडकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे याआधी डिव्हाईसची किंमत आणि प्रमुख स्पेसिफिकेशनबाबत माहिती लीकमध्ये समोर आली आहे. चला, पुढे तुम्हाला सांगतो की Vivo Y300 Plus मध्ये कोणती वैशिष्ट्ये किती कितीमध्ये मिळू शकतात.

Vivo Y300+ ची किंमत आणि भारतातील लाँचची माहिती (लीक)

  • सोशल मीडिया साईट एक्सवर टिपस्टर अभिषेक यादवने Vivo Y300+ ची माहिती शेअर केली आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की Vivo Y300+ ची भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • किंमतीबद्दल माहिती देण्यात आली आहे की आगामी हँडसेट भारतात 23,999 रुपयांमध्ये येऊ शकतो. ही याच्या 8GB रॅम +128GB स्टोरेजची किंमत असण्याची संभावना आहे.

Vivo Y300+ चे स्पेसिफिकेशन (लीक)

डिस्प्ले: लीकनुसार विवो वाय 300 प्लस 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यावर ग्राहकांना एफएचडी+रिजॉल्यूशनला सपोर्ट मिळू शकतो.

प्रोसेसर: Vivo Y300+ फोनची एक गोष्ट जी भारतीय युजर्सना निराश करू शकते, तर याचा प्रोसेसर सांगण्यात आले आहे की डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 695 दिला जाऊ शकतो हा खूप जुना चिपसेट आहे. तुम्ही सोशल मीडिया पोस्टमध्ये पाहू शकता या या चिप बद्दल टिपस्टरने पण हसणारा इमोजी बनविला आहे.

रॅम आणि स्टोरेज: लीकनुसार Vivo Y300+ डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली जाऊ शकते.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता मोबाईलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा इतर सेकंडरी लेन्स मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावला जाऊ शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग: पावर बॅकअपसाठी Vivo Y300 Plus मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 44 वॉट चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

इतर: इतर फिचर्स पाहता मोबाईलमध्ये धूळ आणि पाण्यापासून वाचणारी आयपी 54 रेटिंग, फिंगरप्रिंट सेन्सर, 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स प्रदान केले जाऊ शकतात.

वजन आणि डायमेंशन: फोन 7.57 मिमी आणि 7.49 मिमी जाडी व 183 ग्रॅम आणि 172 ग्रॅम वजनामध्ये येऊ शकतो. हा संभवतः दोन वेगवेगळ्या बॅक पॅनलसाठी ठेवला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here