OPPO Reno12 5G सीरीजच्या भारतातील लाँचची तारीख जाहीर झाली आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, नवीन रेनो सीरीज 12 जुलै रोजी भारतीय बाजारात लाँच केली जाईल. ज्या अंतर्गत OPPO Reno12 5G आणि Reno12 Pro 5G हे फोन लाँच केले जातील. स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट स्पेसिफिकेशन सोबतच या Oppo मोबाईलमध्ये AI फिचर्स देखील उपलब्ध असतील.
OPPO Reno 12 सीरीज भारतातील लाँच तपशील
OPPO Reno 12 आणि Reno 12 Pro भारतात 12 जुलै रोजी लाँच होतील. नवीन Reno 12 सीरीजची जाहिरात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर करत आहे आणि त्याच्यासोबत कंपनी #EverydayAI हा हॅशटॅग देखील वापरत आहे. या फोनमध्ये असलेले आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचा संदर्भ देते. लाँच तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, 12 जुलै रोजी दुपारी Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro ची किंमत आणि विक्री यांचा तपशील उघड होईल. तुम्ही कंपनीच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोनची घोषणा झालेली थेट पाहू शकता.
OPPO Reno 12 सीरीजचे तपशील
- मिडियाटेक डायमेंसिटी 7300 एनर्जी
- 6.7-इंचाचा 120 हर्ट्झ ॲमोलेड स्क्रीन
- 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा (12 Pro)
- 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा (12)
- 80 वॉट फास्ट चार्जिंग
- 5,000 एमएएच बॅटरी
प्रोसेसर: Oppo Reno 12 आणि 12 Pro हे स्मार्टफोन्स MediaTek Dimensity 7300-Energy ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केले जातील, जे 2.5GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडने रन करू शकतील.
डिस्प्ले: स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ कर्व्ह डिस्प्ले असेल. ही स्क्रीन ॲमोलेड पॅनेलवर बनवली जाईल. तसेच ती 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits ब्राईटनेसला सपोर्ट करेल.
फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी OPPO Reno 12 5G मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल आणि Reno 12 Pro 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.
बॅक कॅमेरा: दोन्ही मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर सेटअप मिळेल. यातील बेस मॉडेलमध्ये 50MP + 8MP + 2MP कॅमेरा सेन्सर दिले जातील आणि Reno 12 Pro 5G हा फोन 50MP + 50MP + 8MP ट्रिपल रिअर कॅमेराला सपोर्ट करेल.
बॅटरी: OPPO Reno12 आणि 12 Pro 5G मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी हा स्मार्टफोन 80W SUPERVOOC या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल.
OPPO Reno 12 सीरीजची किंमत (लीक)
Oppo Reno 12 5G आणि Reno 12 Pro 5G हे फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये आणले जातील. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, Oppo Reno 12 5G ची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच ऑफरनंतर त्याची किंमत 28,999 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर सीरीजचे मोठे मॉडेल Oppo Reno 12 Pro 5G हा 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केले जाऊ शकते. ज्याची प्रभावी किंमत 38,999 रुपयांपर्यंत आणली जाण्याची शक्यता आहे.














