OPPO 22 मार्चला आपल्या पॉप्युलर स्मार्टफोन सीरीज Oppo Reno 5 मध्ये एक नवीन फोन Oppo Reno 5F लॉन्च करणार आहे. आता या फोनच्याआधी कंपनीने रेनो 5 सीरीजमध्ये एक नवीन फोन सादर केला आहे जो कंपनीच्या गृह मार्केट मध्ये आला आहे. हा फोन कंपनीने OPPO Reno 5K नावाने मार्केट मध्ये आणला आहे. Reno 5K आधी कंपनी या सीरीज मध्ये Oppo Reno 5 आणि Oppo Reno 5 Pro स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. ओपो रेनो 5के स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन पाहता हे Oppo Reno 5 5G स्मार्टफोन सारखे आहेत, जो चीनी मार्केट मध्ये गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता. दोन्ही फोन मध्ये फरक फक्त प्रोसेसरचा आहे. (Oppo Reno 5K launch in china with 12gb ram price specification )
किंमत
कंपनीने Oppo Reno 5K च्या किंमतीचा खुलासा केला नाही. या फोनची विक्री चीनमध्ये 6 मार्च पासून सुरु केली जाईल, ज्यात फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज विकला जाईल. फोन तीन कलर ऑप्शन-ग्रीन ब्रीज, मिडनाइट ब्लॅक आणि स्टार्री ड्रीम मध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा : Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर यात 6.43 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) ओलेड डिस्प्लेसह 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशिया, 91.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. प्रोसेसिंग पावरसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगॉन 750जी प्रोसेसर देण्यात आला आहे जो Adreno 619 जीपीयूसह येतो. तसेच फोनमध्ये 12 जीबी LPDDR4x रॅम आणि 256 जीबी UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी ओपो रेनो 5के फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus
कनेक्टिविटी ऑप्शनसाठी यात 5जी, 4जी एलटीई, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ वी5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,300एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात SuperVOOC, VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
