Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus

Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ फ्लॅगशिप फोन कंपनीने काल आपल्या गृह मार्केट चीन मध्ये लॉन्च केले आहेत. अनेक दिवसांपासून रेडमी के40 सीरीज मध्ये आलेल्या या फोन्स बद्दल लीक्स समोर येत होते, ज्यांच्यावर आज पूर्णविराम लागला. या सीरीजमध्ये सादर केलेले फोन Redmi K30 आणि K30 Pro स्मार्टफोनचे अपग्रेडेड वर्जन म्हणून मार्केट मध्ये आले आहेत. तिन्ही फोन डिजाइनच्या बाबतीत सारखे आहेत. पण स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत रेडमी के40 या सीरीजचा सर्वात छोटा डिवाइस आहे आणि रेडमी के40 प्रो व रेडमी के40 प्रो प्लस फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये येतात. या लेखात आम्ही तुम्हाला Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro + ची माहिती देत आहोत. (redmi k40 pro redmi k40 pro with snapdragon socs amoled displays 108mp launched price specs)

किंमत

Redmi K40 Pro ची किंमत पाहता कंपनीने डिवाइसचा बेस वेरिएंट म्हणजे 6GB+128GB CNY 2,799 (जवळपास Rs 31,500) मध्ये सादर केला आहे. तसेच फोनचे 8GB+128GB आणि 8GB+256GB वेरिएंट क्रमश: CNY 2,999 (जवळपास Rs 33,744) व CNY 3,299 (जवळपास Rs,37,120) मध्ये आले आहे. या सीरीजच्या सर्वात मोठ्या वेरिएंट म्हणजे Redmi K40 Pro+ च्या 12GB+256GB मॉडेलची किंमत CNY 3,699 (जवळपास Rs 41,632) आहे.

हे देखील वाचा : बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स पाहत या फोन्समध्ये 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजॉल्यूशन 1440 x 3200 पिक्सल आहे. फोनमधील E4 डिस्प्लेची निर्मिती सॅमसंगने केली आहे. फोन फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याची अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे. दोन्ही फोनमध्ये कंपनीने फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC दिला आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU आहे.

फोनमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये Android 11-बेस्ड MIUI 12.5 कस्टम स्किन आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर फोन्स मध्ये पावर बॅकअपसाठी 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण

कॅमेरा

फोनमधील दमदार कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही फोन्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. पण, सेंसर वेगवेगळे आहेत. Redmi K40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. दुसरीकडे Redmi K40 Pro+, मध्ये प्राइमरी कॅमेरा 108MP Samsung HM2 सेंसर आहे आणि इतर दोन्ही सेंसर रेडमी के40 प्रमाणेच आहेत. दोन्ही फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here