Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर

Oppo आपल्या सब-ब्रँड Reno मध्ये पहिला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हँडसेट बद्दल लीक व माहिती समोर येत आहे. आता एका वेबसाइट वर Oppo Reno च्या लॉन्च डेटची माहिती मिळाली आहे. पण लीक व्यतिरिक्त कंपनी ने पण डिवाइसचे काही फीचर्सची ऑफिशल माहिती दिली होती. कंपनी ने कन्फर्म केले होते कि अपकमिंग Oppo Reno मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 10X झूम, 48-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स586 सेंसर आणि एचडीआर सपॉर्ट असेल.

पॉकेट लिंक नावाच्या वेबसाइट नुसार कंपनी ने ओपो रेनो च्या लॉन्च साठी मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे. इनवाइट नुसार कंपनी 24 एप्रिलला ज्यूरिक मध्ये एका इवेंट मध्ये हा हँडसेट लॉन्च करेल. मीडिया इन्वाइट मध्ये ‘beyond the obvious’ टॅगलाइन वापरण्यात आली आहे. इनवाइट नुसार इवेंट 24 एप्रिलला 14:00 – 18:00 CEST (भारतीय वेळेनुसार 5:30 pm – 9:30 pm IST) ला होईल.

विशेष म्हणजे याआधी 1 एप्रिल पासून रेनो ओपो च्या अधिकृत वेबसाइट सोबत चीनी शॉपिंग साइट्स वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला होता. रजिस्ट्रेशन सोबत कंपनी ने फोन लॉन्च डेटची माहिती दिली होती. या माहिती मध्ये सांगण्यात आले होते कि ओपो रेनो येत्या 10 एप्रिलला टेक मंचावर येईल.

काही दिवसांपूर्वी ओपो रेनो चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना वर ओपो रेनो चे दोन मॉडेल समोर आले होते जे पीसीएटी00/ पीसीएएम00 नावाने लिस्ट होते. स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर ओपो रेनो च्या या मॉडेलचा डिस्प्ले 6.4-इंचाचा आहे जो फुल एचडी+ रेज्ल्यूशन सपोर्ट करेल. टेना लिस्टिंग मध्ये प्रोसेसरची माहिती समोर आली नाही पण असे समजले आहे कि तो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला असेल. तसेच ओपो रेनो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाईल.

टेना नुसार ओपो रेनो तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. या फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 8जीबी रॅम सह येईल जो बाजारात 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 128जीबी स्टोरेज वर सादर होईल. तसेच टेना वर ओपो रेनो चा तिसरा वेरिएंट 6जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. टेना वर ओपो रेनो पिंक व गोल्ड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here