5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला पॅनासोनिक चा 4जी वोएलटीई स्मार्टफोन पी90

जपानी कंपनी पॅनासोनिक ने मागच्या महिन्यात भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन पी95 लॉन्च केला होता जो 4,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आज आपला अजून एक लो बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करत पॅनासोनिक ने पी90 लॉन्च केला आहे. पॅनासोनिक ने हा फोन फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो आॅनलाईन प्लॅटफॉर्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

पॅनासोनिक पी90 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे, जो 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 1.25गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसेर सह मीडियाटेक एमटी6737 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने पॅनासोनिक पी90 मध्ये 1जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. या फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी दोन्ही पॅनल वर एलईडी फ्लॅश देण्यात आले आहेत.

पॅनासोनिक पी90 4जी वोएलटीई फोन आहे ज्यात ब्लूटूथ, वाई-फाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. हा फोन डुअल सिम ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सोबत 2,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासोनिक पी90 ब्लू, ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here