Motorola ने भारतात आपला नवीन मिड बजेट स्मार्टफोन Moto G85 5G लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 17,999 रुपयांपासून सुरु होते. स्टायलिश लूक आणि जबरदस्त स्पेसिफिकेशनसह या मोबाईल असणाऱ्या किंमतीवर OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन सेलसाठी उपलब्ध आहे. अशामध्ये प्रश्न आहे की मोटो स्मार्टफोन खरेदी करणे किंवा वनप्लस फोन खरेदी करणे बेस्ट आहे. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही मोटो जी85 5जी आणि वनप्लस नॉर्ड सीई3 लाईटची तुलना केली आहे ज्याला तुम्ही पुढे वाचू शकता.
Moto G85 5G ची किंमत
मोटो जी 85 5 जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आले आहे ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. तसेच मोबाईलचा मोठा मॉडेल 12GB RAM सह 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 19,999 रुपये आहे. भारतीय बाजारात हा मोटोरोला स्मार्टफोन Olive Green, Cobalt Blue आणि Urban Grey कलरमध्ये विकला जाईल.
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत
वनप्लस नॉर्ड सीई 3 लाईट 5 जी फोन भारतात 8GB RAM वर सह दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 128GB मेमरी देण्यात आली आहे ज्याचा किंमत 17,999 रुपये आहे. तसेच मोठा मॉडेल 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. याला Pastel Lime आणि Chromatic Gray कलरमध्ये विकत घेता येईल.
डिझाईनची तुलना
Moto G85 5G चा फोटो
OnePlus Nord CE 3 Lite 5G चा फोटो
स्पेसिफिकेशनची तुलना
| स्पेसिफिकेशन | Moto G85 5G | OnePlus Nord CE 3 Lite 5G |
| स्क्रीन | 6.67″ 120Hz pOLED Curved Display | 6.72″ 120Hz LCD Display |
| प्रोसेसर | Qualcomm Snapdragon 6s Gen 3 | Qualcomm Snapdragon 695 |
| मेमरी | 12GB RAM + 256GB Storage | 8GB RAM + 256GB Storage |
| बॅक कॅमरा | 50MP OIS Main (f/1.79) + 8MP Ultra-wide (f/2.2) | 108MP Main (f/1.7) + 2MP Depth (f/2.4) + 2MP Macro (f/2.2) |
| फ्रंट कॅमरा | 32MP Selfie (f/2.4) | 16MP Selfie (f/2.4) |
| बॅटरी | 5,000mAh Battery | 5,000mAh Battery |
| चार्जिंग स्पीड | 33W TurboPower | 67W SUPERVOOC |
डिस्प्ले
Moto G85 5G फोन 20:9 अॅस्पेक्ट रेश्योवर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही pOLED 3D Curved स्क्रीन आहे जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालते. या डिस्प्लेवर 1600 निट्स ब्राईटनेस सोबतच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.
OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही LCD स्क्रीन आहे 120Hz रिफ्रेश रेट व 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. तसेच यात 680 निट्स ब्राईटनेस, 391 पीपीआय पिक्सल डेनसिटी आणि 16.8 बिलियन कलरला सपोर्टसह डोळ्यांसाठी सुरक्षित स्क्रीन कलर टेम्परेचर सारखे फिचर्स मिळतात.
परफॉर्मन्स
Moto G85 5G अँड्रॉईड 14 आधारित माययूक्स वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 6s Gen 3 ऑक्टाकोर प्रोसर देण्यात आला आहे जो 2.30 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाईल एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो.
OnePlus Nord CE 3 Lite अँड्रॉईड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.1 वर बनला आहे. प्रोसेसिंगच्या बाबतीत हा नवीन नॉर्ड सीई 4 लाइट सारखा ताकदवान आहे. यात 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालणारा Qualcomm Snapdragon 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो.
मेमरी
मोटो जी 85 5 जी फोन 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच झाला आहे. हा मोबाईल RAM Boost टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जो फिजिकल रॅममध्ये 12 जीबी रॅम जोडून याला 24GB RAM ची ताकद देण्याची क्षमता ठेवतो. या फोनमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच फोनमध्ये मेमरी कार्ड लावू शकत नाही.
वनप्लस नॉर्ड सीई 3 लाईट 5 जी फोन भारतात 8GB RAM वर लाँच झाला आहे ज्याच्या सोबत 8GB RAM Expansion टेक्नॉलॉजी मिळते. फिजिकल रॅम आणि वचुर्अल रॅम मिळून 16GB RAM ची ताकद देतो. हा मोबाईल 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळतो ज्यात 1TB मेमरी कार्ड लावले जाऊ शकते.
फोटोग्राफी
बॅक कॅमेरा
Moto G85 5G स्मार्टफोनने ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. हा मोबाईल फोन एफ/1.79 अपर्चर असलेला 50MP Sony LYT600 मेन सेन्सरला सपोर्ट करतो जो OIS टेक्नॉलॉजीसह आहे. त्याचबरोबर बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8MP अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 3 Lite ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 108MP Samsung HM6 मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणाऱ्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह मिळून चालतो.
फ्रंट कॅमेरा
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोटो जी 85 5 जी 32MP Front Camera ला सपोर्ट करतो. हा 0.7µm पिक्सल साईज सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो तसेच क्वॉड पिक्सल टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
वनप्ल्स नॉर्ड सीई 3 लाईटमध्ये सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तथा व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी 16MP Front Camera देण्यात आला आहे. हा 1.0µm पिक्सल साईज सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चर वर चालतो
बॅटरी
Moto G85 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने सांगितले आहे की एकदा फुल चार्ज झाल्यानंतर हा 34 तासांपर्यंत चालतो. तसेच याला फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 30W TurboPower टेक्नॉलॉजी मिळते.
पावर बॅकअपसाठी OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फक्त 30 मिनिटामध्ये हा 80 टक्क्यांपर्यंत फोनला चार्ज करण्यामध्ये सक्षम आहे.
निष्कर्ष : 19,999 रुपयांमध्ये वनप्लस नॉर्ड सीई 3 लाईट 8 जीबी रॅम देतो तसेच मोटो जी 85 मध्ये 12 जीबी रॅम मिळते. Moto G85 5G चा डिस्प्ले वनप्लस मोबाईल पेक्षा खूप चांगला आहे. OnePlus Nord CE3 Lite मध्ये 108 एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा मिळतो, जो मोटो जी 85 50 एमपी ड्युअल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. परंतु पण कॅमेरा सेन्सर क्षमता पाहता मोटो स्मार्टफोनमध्ये OnePlus शी स्पर्धा करण्याची क्षमता आहे. प्रोसेसिंग आणि बॅटरीमध्ये पण दोन्ही आव्हानपूर्ण आहेत. यात चार्जिंग टेक्नॉलॉजी Nord CE3 Lite मध्ये फास्ट मिळते. आमचे असे मत आहे की OnePlus पेक्षा चांगला Moto G85 5G खरेदी करणे फायदेशीर करार असेल.
















