Home बातम्या लाँच ऑफर अंतर्गत 7,799 रुपयांमध्ये मिळेल Poco C51, नंतर वाढणार किंमत

लाँच ऑफर अंतर्गत 7,799 रुपयांमध्ये मिळेल Poco C51, नंतर वाढणार किंमत

Highlights
  • Poco C51 वर introductory offer मिळत आहे.
  • पोकोचा ा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी.
  • Poco C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Poco नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Poco C51 लाँच केला आहे. आज या स्मार्टफोनची विक्री Flipkart वर सुरु होणार आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं एका introductory offer ची घोषणा केली होती. त्यानुसार हा फोन मर्यादित कालावधीसाठी 7,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल, नंतर किंमत वाढवली जाईल. चला जाणून घेऊया MediaTek Helio G36 चिपसेट आणि 8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप असलेल्या Poco C51 ची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन.

Poco C51 ची किंमत

Poco C51 भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, जो 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. या डिवाइसची किंमत 8499 रुपये आहे आणि इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हा फोन फ्लिपकार्टवरून 7,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर किती दिवस असेल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. हा फोन पावर ब्लॅक आणि रॉयल ब्लू कलर या दोन कलर्समध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Realme Narzo N55 मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट; 12 एप्रिलला येतोय भारतात

पोको सी51 चे स्पेसिफिकेशन्स

POCO C51 फोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. POCO C51 फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी कंपनीनं रियर फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर केला आहे. यात 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

पोको सी51 फोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2GHz स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी36 चिपसेटचा केला आहे. हा फोन 4जीबी रॅमसह बाजारात आला आहे. परंतु टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3जीबी अतिरिक्त रॅम मिळवून एकूण 7जीबी रॅमची ताकद मिळवता येते. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेले बेस्ट स्मार्टफोन; पाहा यादी

फोटोग्राफीसाठी POCO C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे आणि जोडीला एक एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.