Realme Narzo N55 मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट; 12 एप्रिलला येतोय भारतात

Highlights

  • Realme Narzo N55 भारतात 12 एप्रिलला लाँच होईल.
  • रियलीमीच्या या फोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
  • कंपनीचा दावा आहे की हा फोन आपल्या प्राइस सेग्मेंटचा सर्वात फास्ट चार्जिंग फोन असेल.

Realme भारतात 12 एप्रिलला Narzo N55 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनच्या ऑफिशियल लाँचपूर्वी कंपनीनं आगामी फोन टीज करत काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स शेयर केले आहेत. Realme Narzo N55 स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फास्ट चार्जिंग फिचरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनच्या चार्जिंग बद्दल थोडी माहिती मिळाली आहे.

Realme Narzo N55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग
  • 29 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज
  • मिळू शकते 5000mAh ची बॅटरी
  • 6GB रॅम आणि 128 स्टोरेज मिळण्याची शक्यता

अ‍ॅमेझॉनच्या लिस्टिंगनुसार, Realme Narzo N55 स्मार्टफोन 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाईल, ज्यात USB Type-C पोर्ट मिळेल. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 29 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होऊ शकतो. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की हा फोन फायर प्रूफ कंस्ट्रॉक्शन फीचरसह येतो, त्यामुळे युजर्सना सेफ चार्जिंग एक्सपीरियंस मिळतो. रियलमच्या आगामी फोनमध्ये 5 कोर प्रोटेक्शन सिस्टम दिली जाईल. हे देखील वाचा: Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस

रियमलीनं सध्या या फोनच्या बॅटरी कपॅसिटीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. अंदाज लावला जात आहे की हा फोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. रियलमीनुसार हा फोन आपल्या प्राइस सेग्मेंटमध्ये सर्वात फास्ट चार्जिंग ऑफर करेल. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की Realme Narzo N55 फोन भारतात 12,000 ते 14,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची लाँच डेट लीक; Dimensity 9200 असलेले फोन लवकरच येऊ शकतात भारतात

फोनबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. Realme Narzo N55 स्मार्टफोन दोन व्हेरिएंट 4GB/6GB RAM आणि 64GB/128GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. तसेच हा फोन प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलर ऑप्शनमध्ये रिलीज होऊ शकतो. या फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक आणि USB Type-C चार्जिंग पोर्टचा सपोर्ट मिळू शकतो. Realme च्या अपकमिंग फोनमध्ये ड्युअल टोन रियर फिनिश आणि ड्युअल कॅमेरा मॉड्यूल मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here