स्वस्तात फ्लिपकार्टवर विकला जात आहे POCO F6 5G, यात आहे शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट

Poco चा स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट असलेला स्मार्टफोन POCO F6 5G भारतीय बाजारपेठेत खूप शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. युजर्सनीही ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर याला चांगले रेटिंग दिले आहे. हे लक्षात घेऊन कंपनी डिव्हाईसवर मोठी सूट ही देत आहे. याचा अर्थ असा की आता तुम्ही लाँच किंमतीपेक्षाही कमी किमतीत फोन खरेदी करू शकाल. चला, पुढे ऑफरचे तपशील किंमत आणि स्पेसिफिकेशन ची अधिक माहिती जाणून घेऊ या.

POCO F6 5G च्या ऑफर्स आणि किमतीचा तपशील

  • फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर POCO F6 5G फोन सध्या 2,000 रुपयांच्या सवलतीसह सूचीबद्ध आहे.
  • डिव्हाईस तीन मेमरी पर्यायांमध्ये येतो. नवीनतम ऑफरनंतर 8GB + 256GB बेस मॉडेल 27,999 रुपये, मिड ऑप्शन 12GB + 256GB हा 29,999 रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट 12GB + 512GB हा 31,999 रुपयांत मिळत आहे.
  • हे तीन मॉडेल्स लाँचच्या वेळी 29,999 रुपये, 31,999 रुपये आणि 33,999 रुपयांना बाजारात आले होते.
    सवलतीच्या ऑफरसोबत तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देखील मिळत आहे.
  • POCO F6 5G मोबाईलला ब्लॅक आणि टायटॅनियम अशा दोन रंगात खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट वरून फोन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

का तुम्ही POCO F6 5G खरेदी केला पाहिजे

आम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणे POCO F6 5G मोबाईल स्नॅपड्रॅगन 8एस जेन 3 चिपसेटसह येतो. त्यामुळे जर तुम्ही स्मार्टफोनचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन खरेदी करत असाल, तर तो एक उत्तम पर्याय ठरेल. विशेष बाब म्हणजे हा डिव्हाईस यावर्षी मे मध्ये लाँच करण्यात आला होता, त्यामुळे यात नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट्स देखील मिळत राहतील. यासोबतच 1.5K ॲमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल (ओआयएस) रिअर कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 90 वॉट फास्ट चार्जिंग हे देखील त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत.

POCO F6 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: POCO F6 मध्ये 6.67 इंचाची ॲमोलेड स्क्रीन आहे. त्यावर 1.5K पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2,400 निट्स पीक लोकल ब्राईटनेस आणि सुरक्षिततेसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस चे संरक्षण उपलब्ध आहे.
  • प्रोसेसर: फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8एस जेन 3 चिपसेट दिला गेला आहे. हा प्रोसेसर 3GHz पर्यंतचे उच्च क्लॉक स्पीड देऊ शकतो. तर ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो 735 जीपीयू उपलब्ध आहे.
  • कॅमेरा: यामध्ये तुम्हाला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड सेन्सर आहे. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेलची फ्रंट लेन्स दिली गेली आहे.
  • बॅटरी: POCO F6 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे. तिला चार्ज करण्यासाठी 90W वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
  • इतर: हा ड्युअल स्टीरिओ स्पीकर, डॉल्बी ॲटमॉस, पाणी आणि धूळ प्रतिरोधक असलेली IP64 रेटिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि 15 5G बँडचा सपोर्ट आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम: स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आणि हायपर ओएस वर आधारित आहे. तर फोनसोबत 3 सॉफ्टवेअर आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here