Home बातम्या पोकोचा नवीन मिड रेंज फोन POCO X3 Pro इंडियन साइटवर झाला लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

पोकोचा नवीन मिड रेंज फोन POCO X3 Pro इंडियन साइटवर झाला लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

भारतात मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन्स सेगमेंट मार्केट मध्ये आपल्या अनेक शानदार फोनद्वारे कब्जा करणारी POCO कंपनी लवकरच एक नवीन फोन POCO X3 Pro लॉन्च करणार आहे. आतापर्यंत हा अपकमिंग फोन US Federal Communications Commission (FCC), EEC, IMDA आणि TUV सारख्या अनेक बेंचमार्किंग आणि सर्टिफिकेशन साइट दिसला आहे. या सर्टिफिकेशन साइटवर फोनच्या स्पेसिफिकेशन्सची झलक पण दिसली आहे. आता POCO X3 Pro ला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोनचा भारतीय लॉन्च काही पाऊलांवर आहे.

Bureau of Indian Standards (भारतीय मानक ब्यूरो) वर पोको एक्स3 प्रो मॉडेल नबंर M2102J20SI सह स्पॉट केला गेला आहे. BIS व्यतिरिक्त, POCO X3 प्रो ला मलेशिया मध्ये SIRIM (स्टॅंडर्ड अँड इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ मलेशिया) सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. SIRIM सर्टिफिकेशवर पण डिवाइस M2102J20SG मॉडेल नंबरसह स्पॉट केला गेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी FCC सर्टिफिकेशनवर POCO X3 प्रो मॉडेल नंबर M2102J20SG च्या स्वरूपात दिसला होता त्यामुळे हा फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येऊ शकतो असे वाटत आहे.

हे देखील वाचा : या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन बनवा Driving Licence, लांबलचक रांगेपासून मिळवा मुक्तता

स्पेसिफिकेशन्स

गेल्या आठवड्यात XDADevelopers द्वारे समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये असा खुलासा झाला होता कि या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम SM8150 (स्नॅपड्रॅगॉन 855) SoC असू शकतो. तर, डिवाइस 48-मेगापिक्सलच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.

या आगामी स्मार्टफोनच्या इतर स्पेक्स जसे कि डिस्प्ले साइज, बॅटरी क्षमता आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही. तसेच POCO X3 प्रो अधिकृत होईल कि नाही हे पण निश्चित नाही कारण POCO ने या आगामी डिवाइसची कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5

POCO X3

गेल्या वर्षी POCO ने भारतात सप्टेंबर मध्ये POCO X3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन मध्ये 6.67-इंचाचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला होता, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz होता. तसेच, फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली होती.

फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 64MP चा प्राइमरी कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाइड लेंस f / 2.2 अपर्चर, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP ची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 20MP चा कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली होती.