बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5

पावरफुल गेमिंग स्मार्टफोन्सचा उल्लेख करायचा झाला तर ASUS ROG Phone चे नाव यादीत सर्वात वर येते. ROG म्हणजे Republic of Gamers हि सीरीज खासकरून त्या मोबाईल युजर्ससाठी डिजाईन केली गेली आहे जी फोन मध्ये हेवी ग्राफिक्स असलेले गेम खेळणे पसंत करतात. मागे बातमी आली होती कि ASUS ROG Phone 3 च्या यशानंतर कंपनी ASUS ROG Phone 5 स्मार्टफोन बाजारात घेऊन येण्याची तयारी करत आहे. आज असूस आरओजी फोन 5 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे.

ASUS ROG Phone 5 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर ASUS_I005DA मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 8 फेब्रुवारीची आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्ससंबंधित महत्वाचे डिटेल्स मिळाले आहेत. लिस्टिंग मध्ये फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘lahaina’ लिहिण्यात आले आहे. हे कोडनेम क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटचे आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट क्वाॅलकाॅमने आतापर्यंत सादर केलेल्या सर्व चिपसेट मध्ये सर्वात जास्त ताकदवान आहे आणि हा चिपसेट 5G ला पण सपोर्ट करतो.

गीकबेंच लिस्टिंग नुसार असूस आरओजी फोन 5 स्मार्टफोन 16 जीबी रॅमसह लाॅन्च केला जाईल. पण फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल आणि 16 जीबी रॅम असलेला सर्वात मोठा वेरिएंट असू शकतो. लिस्टिंग मध्ये ASUS ROG Phone 5 लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे ज्यात 1.80गीगाहर्ट्ज बेस स्पीड असलेला आक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. आरओजी फोन 5 ला सिंगल-कोर मध्ये 1125 आणि मल्टी-कोर मध्ये 3714 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 5 संबंधित इतर लीक्स आणि सर्टिफिकेशन्स पाहता फोन बद्दल सांगण्यात आले आहे कि हा हाई रिफ्रेश रेट असलेल्या ओएलईडी पॅनलसह लाॅन्च होईल ज्यात 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे डायमेंशन 172.834 x 77.252 x 10.29एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या लीक मध्ये असूस आरओजी फोन 5 चा 8 जीबी रॅम वेरिएंट पण समोर आला आहे.

ROG Phone 3

असूस आरओजी फोन 5 बद्दल रिपोर्ट समोर आला आहे कि हा फोन फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी आगामी आरओजी फोन 5 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 65वाॅट रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here