या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन बनवा Driving Licence, लांबलचक रांगेपासून मिळवा मुक्तता

आजपण ऑनलाइन सरकारी कागदपत्रे बनवणे अनेकांना पर्वत उचलण्यासारखे वाटते, पण तुम्हाला योग्य पद्धत माहित असेल तर तुम्ही सरकारी कार्यालयाच्या लांबलचक रांगेत न थांबता घरबसल्या जवळपास सर्व कागदपत्रे मिळवू शकता. यासाठी आम्ही अनेकदा तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्सची माहिती देत असतो, जेणेकरून तुम्ही तुमचा वेळ वाचवून हे काम करू शकता. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंस बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंससाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला रहिवाशी पुरावा (Resident Proof) म्हणून आधार कार्ड, वोटर कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला इत्यादींपैकी एकाची स्कॅन कॉपी आवश्यक आहे. तसेच तुमच्या सहीची स्कॅन कॉपी पण लागेल.

त्यांनतर वयाचा पुरावा म्हणून दहावीची मार्कशीट, जन्मदाखला, पॅन कार्ड किंवा एफिडेविट या पैकी एकाच्या स्कॅन कॉपी सोबत एक स्कॅन पासपोर्ट साइज फोटो लागेल.

अश्याप्रकारे करा लर्निंग लाइसेंससाठी ऑनलाइन अर्ज

– सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाइटवर जा आणि ‘Driving license-related services’ वर क्लिक करा.

– त्यांनतर तुमच्या राज्याची निवड करा लर्निंग लाइसेंसच्या ऑप्शनवर क्लिक करा.

– त्यांनतर तुमच्याकडे माहिती मागितली जाईल.

– हि माहिती दिल्यानंतर एक फॉर्म समोर येईल.

– फॉर्म भरल्यानंतर फीचे पेमेंट करावे लागेल.

– नंतर तुमचे डॉक्यूमेंट, फोटो, सिग्नेचर अपलोड करावी लागेल.

– शेवटी तुम्हाला एक स्लॉट बुक करावा लागेल, ज्या तारखेला तुम्ही ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंससाठी टेस्ट देऊ इच्छित असाल त्या तारखेची निवड करा.

– जर तुम्ही लर्नर लाइसेंसच्या टेस्ट मध्ये पास झालात तर 6 महिन्याच्या वैधतेसह तुम्हाला लर्निंग लाइसेंस दिले जाईल. जात तुम्ही नापास झालात तर फी देऊन पुन्हा ऑनलाइन टेस्ट देण्याची प्रक्रिया करू शकता.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

लर्नर लाइसेंस बनवल्यानंतर 6 महिन्यात तुम्हाला कायमस्वरूपी लाइसेंससाठी अर्ज करावा लागेल. पुढील प्रक्रियेसाठी पण तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ड्राइविंग टेस्टसाठी बोलवण्यात येईल. या ड्राइविंग टेस्टसाठी तुम्हाला अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. जर तुम्ही टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा ज्या वाहनाच्या परवान्यासाठी अर्ज केला असेल ते वाहन चालवून दाखवावे लागेल. त्यासाठी तुमच्याकडे ते वाहन असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही टेस्ट मध्ये पास झालात तर मोटर व्हीकल इंस्पेक्टर तुमच्या अर्जाला मंजुरी देईल. तसेच काही दिवसांनी तुम्हाला ड्राइविंग लाइसेंस दिले जाईल.

हे देखील वाचा : भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी

Note: parivahan.gov.in वेबसाइटच्या माध्यमातून Arunachal Pradesh, Assam, Bihar, Chhattisgarh, Chandigarh, Delhi, Goa, Gujrat, Haryana, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Jharkhand, karnataka, Kerala, Ladakh, Maharashtra, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Odisha, Pondicherry, Punjab, Rajasthan, Sikkim, Tamilnadu, Tripura, UT of DNH and DD, Uttarakhand, Uttar Pradesh आणि West Bengal राज्यातील लोक आपले ड्राइविंग लाइसेंस बनवू शकतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here