Home बातम्या एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी

एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी

image courtesy: News18

Xiaomi चे नाव त्या टेक कंपन्यांमध्ये येते ज्यांनी आपल्या स्वस्त मोबाईल फोन्सच्या जीवावर फॅन फॉलोविंग मिळवली आहे. स्वस्त फोन्सच्या माध्यमातून भारतात हिट होणाऱ्या शाओमीने आपल्या फॅन्ससाठी अजून एक नवीन ऑफरची सुरुवात केली आहे. या शानदार ऑफर अंतगर्त कंपनीने एक किंवा दोन नाही तर एकूण 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत आणि हे मोबाईल फोन्स 2,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. (price cut on xiaomi redmi phones in india sale offer)

रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर प्राइस कट लागू करत कंपनीने Redmi Note 9 Pro Max, Redmi Note 9 Pro, Redmi Note 9, Redmi 9 Prime आणि Redmi 9i च्या किंमती कमी केल्या आहेत. शाओमीची हि ऑफर 1 मार्चपासून सुरु झाली आहे जी 15 मार्चपर्यंत सुरु राहील. 15 दिवस सुरु राहणाऱ्या या ऑफरमध्ये उपरोक्त सर्व स्मार्टफोन्स कमी किंमतीत विकत घेता येतील. कोणत्या फोनची किंमत किती कमी झाली आहे याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

कोणता फोन झाला किती स्वस्त

Redmi Note 9 Pro Max पाहता 64एमपी क्वॉड रियर आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करणाऱ्या या फोनच्या किंमतीत कंपनीने थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 16,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण ऑफरअंतगर्त आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 18,499 रुपयांचा फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट एक हजारच्या डिस्काउंटनंतर 17,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा : 4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

Redmi Note 9 Pro चा पण सर्वात मोठा वेरिएंट 2,000 रुपये तर छोटा वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपयांवरून 13,999 रुपये करण्यात आली आहे तसेच 13,999 रुपयांचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये खरीदसाठी उपलब्ध झाला आहे.

Redmi Note 9 स्मार्टफोन ऑफर अंतगर्त कमी किंमतीत विकत घेता येईल. फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 14,999 रुपये होती जी आता 13,999 रुपये झाली आहे. तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज बेस वेरिएंट 11,999 रुपयांच्या ऐवजी आता 1,000 रुपये कमी म्हणजे 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी रेडमी 9 चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट पण 500 रुपयांनी स्वस्त होऊन 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

Redmi 9 Prime च्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,000 रुपये कमी झाली आहे त्यामुळे 11,999 रुपयांचा हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 500 रुपयांच्या प्राइसकटनंतर या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपयांवरून 9,499 रुपये झाली आहे. ऑफर अंतगर्त 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला Redmi 9i पण फक्त 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे.