8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

Xiaomi ने गेल्यावर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 10T भारतात लॉन्च केला होता. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन सोर्सद्वारे माहिती मिळाली आहे कि कंपनीने या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 हजार रुपयांची कपात केली आहे. मार्केटमध्ये Xiaomi Mi 10 दोन वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येतो आणि दोन्ही वेरियंटची किंमतीत जवळपास 3 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कमी किंमतीत ऑनलाइन व ऑफलाइन विकत घेऊ शकतात. Mi 10T चा प्राईस कट मर्यादित कालावधीसाठी आहे. पुढे तुम्हाला फोनची नवीन किंमत आणि स्कीमसह डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत. (xiaomi mi 10t 8gb ram 64mp camera phone price dropped by rs 3000 know new sale prices)

स्कीम काय आहे

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या स्कीममध्ये कंपनी मी10टी कमी किंमतीत 1 मार्च 2021 ते 15 मार्च 2021 पर्यंत 3,000 डिस्कॉउंटसह विकला जाईल. फोन तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवरून विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

नवीन किंमत

Xiaomi ने Mi 10T च्या लॉन्च किंमतीत 3,000 रुपयांची कपात केली आहे. मी 10टी चा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण आता हा 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, कपातीनंतर फोन 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी हँडसेटमध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

हे देखील वाचा : मागवला होता Apple iPhone पण मिळाला Apple ज्यूस! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

फोटोग्राफीबद्दल बोलायचे तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इंफ्रारेड (आईआर) आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

शाओमी मी 10टी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here