4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

Redmi Note 9 Pro

Xiaomi ने सांगितले आहे कि कंपनी या आठवड्यात मोठा लॉन्च करणार आहे. 4 मार्चला शाओमी आपली ‘रेडमी नोट 10’ सीरीज सादर करेल. चर्चा अशी आहे कि या सीरीज अंतगर्त Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. हा एक ग्लोबल लॉन्च असेल जो 4 मार्चला भारतासह इतर मार्केट्समध्ये पण फोन घेऊन येईल. कंपनीने हि सीरीज सोशल मीडियावर टीज केला जात आहे ज्यात स्मार्टफोन मॉडेल्सचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. जर तुम्ही पण रेडमी नोट 10 सीरीज मध्ये बद्दल माहिती घेऊ इच्छित असाल तर पुढे तुम्ही लॉन्चच्याआधीच जाणून घेऊ शकाल कि काय असेल Xiaomi Redmi Note 10 सीरीजमध्ये खास. (know everything about Xiaomi Redmi Note 10 series before 4 march india launch)

108एमपी कॅमेरा

शाओमी रेडमी नोट 10 सीरीजबद्दल बोलले जात आहे सीरीजमध्ये लॉन्च होणारा सर्वात मोठा मॉडेल 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल, त्यासोबत 5 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस दिली जाईल. बोलले जात आहे कि हि टेलीफोटो + मॅक्रो लेंस असेल. तर दुसरीकडे रेडमी नोट 10 स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेरा सेटअपवर लॉन्च केला जाईल ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या सेटअप मध्ये पण अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रो लेंस असेल.

डिस्प्ले

Xiaomi Redmi Note 10 Pro Max म्हणजे सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेवर लॉन्च करेल. तर दुसरीकडे रेडमी नोट 10 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल. शाओमीची संपूर्ण सीरीज पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याला कंपनीने डॉट डिस्प्लेचे नाव दिले आहे.

बॅटरी

शाओमी रेडमी नोट 10 च्या लीक झालेल्या रिटेल बॉक्सवर फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स सोबतच याची बॅटरी कपॅसिटी पण लिहिण्यात आली आहे. फोन बॉक्सवरून समजले आहे कि Redmi Note 10 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च केला जाईल जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच आशा व्यक्त केली जात कि सीरीजचे इतर स्मार्टफोन्स पण 5,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त कपॅसिटीच्या बॅटरीला सपोर्ट करतील.

5G

यावर्षी जगासोबत भारतात पण 5जीचा विस्तार होईल आणि सर्व मोबाईल कंपन्या याची तयारी करत आहेत. काळाची मागणी बघता शाओमी पण आपली Redmi Note 10 सीरीज 5जी कनेक्टिविटीसह बाजारात घेऊन येईल. सीरीजचे तिन्ही फोन 5जीला सपोर्ट करणार नाहीत तर बेस वेरिएंटमध्ये 4जी मिळेल आणि मोठे मॉडेल 5जी सह बाजारात येतील.

प्रोसेसर

रेडमी नोट 10 स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर फोनच्या रिटेल बॉक्सवरून खुलासा झाला आहे कि हा मोबाईल फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेटवर लॉन्च होईल. क्वॉलकॉमद्वारे लॉन्च करण्यात आलेला हा चिपसेट जास्त जुना नाही तसेच हा 11नॅनोमीटर फेब्रिकेशनवर चालतो. रेडमी नोट 10 मध्ये आक्टाकोर प्रोसेसर पण मिळेल.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here