Realme बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी Realme 8 सीरीज आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Realme 8 आणि Realme 8 Pro भारतात पुढल्या वर्षी जानेवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. आता Realme 8 स्मार्टफोन कथितरित्या बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये अपकमिंग स्मार्टफोनच्या काही शानदार फीचर्सची माहिती पण समोर आली आहे. लिस्टिंग वरून समजले आहे कि या स्मार्टफोन वर सध्या काम चालू आहे.
गीकबेंच लिस्टिंग मध्ये Realme फोन मॉडेल नंबर RMX3092 सह दिसला आहे. टिप्सटर मुकुल शर्मा आणि अभिषेक यादवने माहिती दिली आहे कि हा मॉडेल नंबर Realme 8 चा असेल. तसेच गीकबेंच लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये अँड्रॉइड 10 सॉफ्टवेयर आणि 8 जीबी रॅम सह येईल. रियलमी 8 फोन मध्ये प्रोसेसर मीडियाटेक डायमेंसिटी 720 ऑक्टा-कोर प्रोसेसर व बेस फ्रीक्वैंसी 2 गीगाहर्ट्ज असेल.
हे देखील वाचा : Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग
गीकबेंच व्यतिरिक्त Realme RMX3092 मॉडेल ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वेबसाइट वर पण दिसला आहे, यामुळे फोन भारतात येणार या चर्चेला पण उधाण आले आहे. टिप्सटरने असे पण सुचवले आहे आहे कि या फोनचा Realme 8 Pro वेरिएंट पण असू शकतो.
यावर्षी सप्टेंबर महीने मध्ये लॉन्च झालेल्या Realme 7 सीरीजची सक्सेसर म्हणून पुढल्या वर्षी कंपनी रियलमी 8 सीरीज सादर करण्याची प्लानिंग करत आहे. आशा आहे कि या सीरीज मध्ये रियलमी 7 च्या तुलनेत जास्त चांगले स्पेसिफिकेशन आणि फीचर्स दिले जाऊ शकतात. कंपनीने अजूनही कोणती अधिकृत माहिती दिली नाही.
हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह OPPO Reno 5 लाॅन्च, यात आहे 50W SuperVOOC टेक्नोलाॅजी
Realme 7
Realme 7 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रेज्योल्यूशन आणि 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतो. तसेच या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, जो AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाय बेंचमार्क मिळाले आहेत. हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच रियलमी 7 मध्ये 5000mAh बॅटरी 15W PD चार्ज सपोर्ट सह येते.
