44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह OPPO Reno 5 लाॅन्च, यात आहे 50W SuperVOOC टेक्नोलाॅजी

OPPO ने डिसेंबरच्या सुरवातीला टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च केले होते, जे चीन मध्ये आले होते. ओपोचे हे दोन्ही स्मार्टफोन 5G सपोर्ट सह बाजारात आले होते जे 64MP क्वाॅड कॅमेरा आणि 65वाॅट फास्ट चार्जिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात. 5जी रेनो5 सीरीज नंतर ओपोने OPPO Reno 5 4G मॉडेल पण टेक मंचावर सादर केला आहे. कंपनीने हा फोन सध्या वियतनाम मध्ये लाॅन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर बाजारांमध्ये येईल.

OPPO Reno 5 4G

ओपो रेनो 5 4जी मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वर सादर केला गेला आहे जो 6.4 इंचाच्या एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते ज्याच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. ओपोने आपला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सह भारतात आला स्वस्त Vivo Y20A, करेल का Xiaomi-Realme ची सुट्टी?

OPPO Reno 5 4G अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस 11 वर लाॅन्च केला गेला आहे जो कलरओएस 11.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट आहे. याउलट OPPO Reno5 5G क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट तर OPPO Reno5 5G Pro मीडियाटेक डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ओपो रेनो5 4जी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Reno 5 4G क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलची सुपरवाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी

OPPO Reno 5 4G एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50W SuperVOOC fast charging टेक्नॉलॉजी सह काम करते. ओपो रेनो5 4जी मॉडेलची किंमत भारतीय करंसीनुसार 27,000 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here