Realme X असेल रियलमीच्या पहिल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव, कंपनी ने केला हा महत्वाचा खुलासा

रियलमी बद्दल कालच एक धक्कादायक बातमी समोर आली होती कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. रियलमीचा हा फोन एका वीडियो द्वारे समोर आला होता ज्यात फोनची पहिली झलक मिळाली होती. वीडियो मध्ये या पॉप-अप सेल्फी फोनचा खुलासा झाल्यानंतर आता कंपनीने पण या फोनची माहिती दिली आहे. रियलमीने कंपनीच्या आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव ऑफिशियल केले आहे.

Realme X असेल नाव
Realme CMO Xu Qi यांनी रियलमीच्या या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव सांगितले आहे. Qi यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत ब्रांडच्या आगामी स्मार्टफोनच्या नावाची माहिती दिली आहे. सीएमओ ने सांगितली आहे कि रियमली जो पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे तो Realme X नावाने बाजारात येईल. सोबत कंपनी सीएमओ ने म्हटले कि Realme X फुलस्क्रीन डिजाईन सह सादर केला केला जाईल आणि हा ब्रांडचा हाईएंड स्मार्टफोन असेल.

अशी असेल डिजाईन
Realme X सर्वात आधी रियलमीच्या एका वीडियो मध्ये समोर आला होता. हा वीडियो कंपनीच्या एका थीम सॉगचा होता ज्यात Realme X ची झलक दिसली होती. या वीडियो मध्ये फोन फुलव्यू डिस्प्ले वर बनवलेला दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या भागात दोन्ही बाजूला पूर्णपणे फोन बॉडी आहे. यात कोणतीही नॉच किंवा इतर सेंसर नाही. तसेच डिस्प्लेच्या खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. दिसायला फोनचा डिस्प्ले साईज पण खूप मोठी दिसत आहे.

हा वीडियो रियलमी चाईनाच्या वेईबो पेज वर शेयर करण्यात आला आहे जो 47 सेकंदांचा आहे. या वीडियोच्या 31 व्या सेकंदाला Realme X हातात असल्याचे दाखवण्यात आले आहे ज्यात तरुण ग्रुप सेल्फी घेतात आणि फोनच्या वरच्या पॅनल वर मधोमध पॉप-अप कॅमेरा आहे. या पॉप-अप कॅमेरा वर सिंगल फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या वरील पॅनल वर 3.5एमएम आडियो जॅक पण वीडियो मध्ये दिसला आहे. रियलमी कधी हा फोन सादर करेल हे सांगता येणार नाही, पण Realme X संबधीत कोणतीही माहिती समोर येताच तुम्हाला दिली जाईल.

गेल्याच आठवड्यात रियलमी ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये दोन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात Realme 3 Pro आणि Realme C2 चा समवेश होता. हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आले होते. Realme 3 Pro 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme C2 कंपनी ने 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला गेला आहे.

रियलमी ने Realme 3 Pro चा 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच Realme C2 चा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये बाजारात आला गया आहे. Realme 3 Pro देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे तर Realme C2 साठी 15 मे ची वाट बघावी लागेल.

SOURCE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here