फ्लिपकार्ट आपल्या आगामी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2023 सेलची माहिती दिली आहे. हा सेल भारतात 5 मे 2023 ला सुरु होईल, परंतु यातील डील्सची माहिती आजपासून उपलब्ध झाली आहे. सेलमध्ये अनेक ऑफर्स उपलब्ध होतील परंतु यातील एक ऑफर लक्ष वेधून घेते. फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये Realme GT Neo 3T स्मार्टफोन फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोनवरील ऑफर
सध्या हा फोन फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, त्यामुळे सेलमध्ये कमीत कमी 4,000 रुपयांच्या डिस्काउंट मिळेल हे स्पष्ट झालं आहे. या डिस्काउंटमध्ये बँक डिस्काउंटचा समावेश असेल की नाही हे स्पष्ट झालं नाही. हा फोन विकत घ्यायचा की नाही ते तुम्हाला याच्या स्पेक्सवरून समजेल. हे देखील वाचा: अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस
रियलमी जीटी नियो 3टी चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी जीटी नियो 3टी कंपनीनं 1080 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच आहे. फोनची स्क्रीन Samsung E4 AMOLED पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा रियलमी मोबाइल 1300निट्स ब्राइटनेस, 397पीपीआय, आणि 106 एनटीएससी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सल 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
रियलमी जीटी नियो 3टी अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो 650 जीपीयू आहे. हे देखील वाचा: क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह Redmi Note 12R Pro ची एंट्री; जाणून घ्या फीचर्स
पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच या रियलमी मोबाइल फोनमधील बॅटरी देखील दमदार आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. तसेच स्मार्ट मल्टी आयसी चिप फोन बॅटरी हीट होऊ देत नाही व थंड ठेवते.
