क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह Redmi Note 12R Pro ची एंट्री; जाणून घ्या फीचर्स

Highlights

  • Redmi Note 12R Pro मध्ये OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राइटनेससह मिळतो.
  • हा फोन Snapdragon 4 Gen 1 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

शाओमीच्या सब ब्रँड रेडमीनं आपला Redmi Note 12R Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. फोनमध्ये OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसेच यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देखील मिळते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, IP53 रेटिंग, 33W फास्ट चार्जिंग असे फिचर देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स:

रेडमी नोट 12आर प्रो ची किंमत

Redmi Note 12R Pro ची किंमत 1,999 युआन (सुमारे 23,649 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस ब्लॅक, व्हाइट आणि गोल्ड कलरमध्ये विकत घेता येईल. सध्या चीनमध्ये लाँच झालेला हा फोन जागतिक बाजारात कधी येईल, हे समजलं नाही. हे देखील वाचा: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

रेडमी नोट 12आर प्रो चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67-inch OLED display
  • Snapdragon 4 Gen 1 processor

Redmi Note 12R Pro स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल एचडी+ 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 1200 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरची ताकद दिली आहे. जोडीला 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 13 OS आधारित MIUI 14 वर चालतो.

  • 48MP dual rear camera
  • 5000mAh Battery, 33W Fast charging

फ्रंटला या फोनमध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पावर बटनमध्ये देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस

  • 5G, 4G
  • IP53 Rating

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5जी, ड्युअल 4जी, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ड्युअल सिम, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5mm ऑडिओ जॅक, इन्फ्रारेड सेन्सर आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन IP53 रेटिंगसह येतो त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो. फोनचे डायमेन्शन 165.88×76.21×7.98एमएम आणि वजन 188 ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here