अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस

Highlights

  • आयडी कार्डचं डिजिटल व्हर्जन म्हणजे e-EPIC
  • याचा वापर फोटो आयडी म्हणून देखील करता येईल.
  • Mobile Phone वर डिजिटल वोटर कार्ड म्हणजे डाउनलोड करता येईल.

भारतात वर्षभर कुठे ना कुठे निवडणूका सुरु असतात. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपासून भारतातील 5 राज्यांमध्ये Assembly Elections 2022 सुरु होणार आहेत तसेच महाराष्ट्रात देखील धुळे, अहमदनगर, जळगाव आणि सांगलीच्या नगरपालिका यंदा होणार आहेत. त्यामुळे लोकशाहीनं तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र (Voter Card) ची गरज पडेल. परंतु जर तुमचं वोटर आयडी कार्ड हरवलं असेल किंवा डिलिव्हरचं झालं नसेल तर काळजी नको. आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या Mobile Phone वर डिजिटल वोटर कार्ड म्हणजे e-EPIC डाउनलोड करू शकता.

e-EPIC Voter Card म्हणजे काय

हे वोटर आयडी कार्डचं डिजिटल व्हर्जन आहे ज्याला e-EPIC अर्थात Electronic Electoral Photo Identity Card म्हणतात. हे इलेक्शन कमीशनकडून PDF फॉरमेट मध्ये उपलब्ध केलं जातं ज्यात कोणतीही एडिटिंग करता येत नाही. या e-EPIC Voter Card कार्डचा वापर फक्त मतदानाच्या वेळी करता येत नाही तर याचा वापर फोटो आयडी म्हणून देखील करता येईल. तुम्ही डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करून Digital lockers जसे की Dagilocker मध्ये सेव्ह देखील करू शकाल. हे देखील वाचा: How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय

पूर्व तयारी

e-EPIC म्हणजे डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागेल. यासाठी राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल म्हणजे NVSP वर जा. वेबसाइट ओपन करण्यासाठी (इथे क्लिक करा)

  • इथे e-EPIC Download चा ऑप्शन मिळेल, तो ओपन केल्यावर रजिस्टर बटनवर क्लिक करा.
  • त्यांनतर e-KYC पूर्ण करण्यासाठी मोबाइल फोनचा कॅमेरा ओपन होईल, त्यात तुमचा चेहरा व्हेरिफाय करा.
  • फेस व्हेरिफिकेशन नंतर तुमचा पर्सनल मोबाइल नंबर टाका आणि डिटेल्स सबमिट करा.
  • तुमच्या नंबर वर ओटीपी येईल, तो टाकताच तुमची केवायसी आणि रजिस्ट्रेशन दोन्ही पूर्ण होईल.

अशाप्रकारे करा e-EPIC voter card डाउनलोड

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर पुन्हा होम पेजवर जा आणि वोटर पोर्टलवर तुमच्या आयडी व पासवर्डनं लॉगइन करा. हे देखील वाचा: Smartphone Heating: तुमचा Mobile Phone गरम होतो? मोठं नुकसान होण्याआधीच आताच घ्या ही काळजी

  • पोर्टलवर Download eEPIC ऑप्शन वर टॅप करा.
  • त्यानंतर वोटर आयडी कार्डचा 10 डिजिट यूनिक EPIC नंबर किंवा रेफरन्स नंबर टाका.
  • तुमचे डिटेल व्हेरिफाय केले जातील आणि मग डिजिटल वोटर आयडी कार्ड डिस्प्ले होईल.
  • त्यांनतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, जो व्हेरिफाय करावा लागेल.
  • व्हेरिफिकेशननंतर डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ फॉर्म मध्ये मोबाइलमध्ये डाउनलोड होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here