Realme काही महिन्यांत आपला हाई-एंड फ्लॅगशिप फोन स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह सादर करेल. कंपनी हा फोन पुढल्या महिन्यात होणाऱ्या MWC 2020 इवेंट नंतर सादर करू शकते. 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि कंपनी स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर असलेला रियलमी फोन सादर करणार आहे.
कंपनी फ्लॅगशिप प्रोसेसर असलेला फोन Realme X50 Pro नावाने सादर करेल. कंपनी Q1 2020 ला टार्गेट करत हा फोन सादर करण्याची प्लानिंग करत आहे. सोर्सनुसार डिवाइस Q2 च्या सुरवातीला किंवा Q1 च्या शेवटी सादर केला जाईल.
आगामी Realme X50 Pro खूप पावरफुल फोन म्हणून प्रमोट केला जात आहे. डिवाइसची मार्केटिंग iPhone 11 सीरीजच्या विरोधात केली जाईल. अलीकडेच AnTuTu बेंचमार्किंग साइट वर रियलमीचा फोन मॉडेल नंबर RMX2071 सह ऑनलाइन दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये डिवाइसला 574,985 प्वाइंट्स मिळाले होते. हा बेंचमार्किंग वरचा चांगला स्कोर आहे.
Realme X50 Pro बद्दल बोलले जात आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाईल. याव्यतिरिक्त कंपनी MWC 2020 मध्ये इवेंटचे आयोजन करणार आहे. हा ब्रँडचा पहिला ग्लोबल लॉन्च इवेंट असेल. या इवेंट मध्ये कोणत्या फोनची घोषणा केली जाईल याची माहिती समोर आली नाही.
काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सला माहिती मिळाली होती कि रियलमी आपली हि नवीन सीरीज साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत बाजारात आणू शकते आणि Realme 6 सीरीज सह Realme U2 आणि Realme C3 स्मार्टफोन्स पण भारतीय बाजारात येऊ शकतात.
Realme 6 सीरीज मध्ये कंपनी Realme 6, Realme 6 Pro आणि Realme 6i येत्या काही दिवसांत सादर करू शकते. फक्त इतकेच नाही तर रियलमी ब्रँड आपल्या फॅन्सना सरप्राइज देत Realme U2 आणि Realme C3 स्मार्टफोन पण लवकरच समोर आणू शकते.














