Categories: बातम्या

रियलमी च्या सीईओ कडून झाली चूक, लॉन्चच्या आधीच समोर आला रियलमी यू1 चा लुक

91मोबाईल्स ने मागच्या आठवड्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती की स्मार्टफोन ब्रँड रियलमी एक अगदी नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जी कंपनी ‘यू सीरीज’ च्या नावाने बाजारात आणेल. आम्ही हे पण सांगितले होते की यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा फोन भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन असेल. बातमी दिल्यानंतर दोन दिवसांनीच रियलमी ने स्वतः आपली ‘यू सीरीज’ समोर आणत अनाउंस केले होते कि कंपनी येत्या 28 नोव्हेंबरला यू सीरीजचा पहिला स्मार्टफोन रियलमी यू1 लॉन्च करेल. तर आज आम्ही रियलमी यू1 च्या लॉन्चच्या आधीच या फोनची पहिली झलक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

रियलमी यू1 च्या लॉन्च च्या आधीच आम्हाला या फोनचा फोटो मिळाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या या फोटो मध्ये रियलमी यू1 कंपनीचे वरिष्ठ ​अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या हातात पकडला आहे आणि रियलमी यू1 मधून सेल्फी घेत आहेत. मिळालेल्या फोटो मध्ये रियलमी यू1 चा बॅक पॅनल दिसला आहे. रियलमी यू1 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो हॉरिजोन्टल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप च्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे.

रियलमी यू1 च्या फोटो मध्ये फोन गोल्ड कलर मध्ये दाखविण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर पण आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे. फोटो मध्ये फोनची साईज मोठी वाटते ज्यावरून आपण असे म्हणू शकतो की रियलमी यू1 मध्ये 6-इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले देऊ शकते. विशेष म्हणजे कंपनी ने आधीच सांगितले आहे की रियलमी यू1 मध्ये ‘यू’ शेप वाली ड्यूड्रॉप नॉच देण्यात येईल.

रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट मिळेल हे पण कंपनी ने आपल्या मीडिया इन्वाईट मधून कंफर्म केले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमीटर टेक्नोलॉजी वर बनेल. रियलमी यू1 सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि यात पावरफुल फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. बोलले जात आहे की रियलमी यू1 कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये रुपये लॉन्च करेल. रियलमी यू1 चे ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 नोव्हेंबर ची वाट बाघवी लागेल.

Published by
Siddhesh Jadhav