Realme ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि ते Realme X2 Pro येत्या 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करतील. आपली ‘एक्स सीरीज’ वाढवत कंपनीने काही दिवसांपूर्वी यूरोपियन बाजारात Realme X2 Pro सादर केला होता. आता Realme X2 Pro ची फ्लिपकार्ट वर एक माइक्रोसाइट बनवण्यात आली आहे.
या माइक्रोसाइट वरून स्पष्ट झाले आहे कि स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट द्वारे विकला जाईल. तसेच हा फोन रियलमीच्या अधिकृत वेबसाइट Realme.com वर पण सेल केला जाईल. कंपनी हा फोन ऑफ लाइन चॅनेल्सच्या माध्यमातून पण विकू शकते. पण याचा खुलासा लॉन्चच्या वेळी होईल. विशेष म्हणजे माइक्रोसाइट वर फोनचे नाव रियलमी एक्स 2 प्रो नाही तर लॉन्च होणाऱ्या फोनचे नाव Realme X2 Pro सांगण्यात आले आहे.
Realme X2 Pro ब्रँडचा 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असलेला फोन आहे जो यूरोप मध्ये आधीच लॉन्च झाला आहे. या फोनची इंडिया लॉन्च डेट तेव्हा घोषित करण्यात आली जेव्हा रियलमीच्या प्रतिस्पर्धी टेक कंपनी Xiaomi ने भारतात आपला पाहिला 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 8 Pro लॉन्च करण्याची तयारी केली आहे. Redmi Note 8 Pro लॉन्च होण्याआधी Realme X2 Pro ची घोषणा रियलमीची शार्प मार्केट स्ट्रॅटेजी दर्शवते. त्यामुळे Realme X2 Pro ची लॉन्च डेट समजल्यामुळे Redmi Note 8 Pro च्या मागणी आणि विक्री वर पण मोठा प्रभाव पडू शकतो.
शानदार कॅमेरा
Realme X2 Pro स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 64MP GW1 प्राइमरी सेंसर, 13MP टेलीफोटो लेंस सोबत 20x हाइब्रिड झूम सपॉर्ट, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 115-डिग्री फिल्ड ऑफ व्यू आहे जी 2.5mm मॅक्रो शॉट्स घेईल. तसेच हा फोन 4K 60fps वीडियो आणि 960fps स्लो-मोशन रेकॉर्ड करू शकतो. वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
Realme X2 Pro मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच Realme X2 Pro मध्ये डुअल स्टीरियो स्पीकर्स Dolby Atmos आणि सर्टिफाइड Hi-res साउंड क्वॉलिटी सपॉर्ट सह मिळेल. तसेच Realme X2 Pro मध्ये 50 वॉट VOOC चार्जिंग टेक्नोलॉजी सह पावरफुल 4,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.















