Realme ने आपल्या X50 सीरीज मध्ये आता पर्यंत चार फोन लॉन्च केले आहेत, ज्यात Realme X50 5G, X50 Pro 5G, X50m आणि X50 Player Edition चा समावेश आहे. यातील एक्स50 प्लेयर एडिशन कंपनीने काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला आहे. आता माहिती समोर येत आहे कि कंपनी या सीरीज मध्ये आपला अजून एक नवीन फोन Realme X50t 5G सादर करू शकते. हा नवीन फोन मॉडेल नंबर RMX2052 सह गूगल प्ले सपोर्ट डिवाइसच्या लिस्ट मध्ये दिसला आहे. हि लिस्टिंग MySmartPrice द्वारे समोर आली आहे. लिस्टिंग मध्ये फोनची जास्त माहिती समोर आलेली नाही.
लिस्टिंग मध्ये Realme X50t 5G सपोर्ट सह दाखवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे कि कंपनी हा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोनच्या कॅटेगरी मध्ये 5जी चिपसेट सह सादर करेल. पहिल्यांदाच Realme X50t मॉडेलची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजूनतरी फोनच्या नावामधील ‘t’ कोणत्या दिशेने इशारा करत आहे हे सध्यातरी सांगता येणार नाही.
तुम्हाला माहित असेलच कि Realme X50 5G यावर्षी जानेवारी मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G SoC आणि 120Hz डिस्प्ले सह लॉन्च केला गेला होता. त्यानंतर कंपनीने Realme X50 Pro 5G सादर केला होता जो स्नॅपड्रॅगॉन 865 SoC आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह आला होता. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने एप्रिल मध्ये Realme X50m सादर केला जो स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट आणि 120Hz डिस्प्ले सह आला होता. तसेच या आठवड्याच्या सुरवातीला रियलमीने या सीरीज मध्ये आपला लेटेस्ट फोन Realme X50 Pro Player Edition चीन मध्ये सादर केला होता.
रियलमी एक्स50 प्रो प्लेयर एडिशन बद्दल बोलायचे तर यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर वर चालतो. डिवाइस मध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे. फोन मध्ये 4,100 एमएएच ची बॅटरी आहे. जी 30 वॉट सुपरडार्ट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.
रियलमी एक्स50 5जी वीडियो