8GB रॅम, 64MP कॅमेरा आणि शानदार डिजाइन सह लॉन्च झाले Realme X7 आणि X7 Pro, बघा स्पेसिफिकेशन्स

Realme ने आज आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये नवीन सीरीज Realme X7 लॉन्च केली आहे. कंपनीने वर्चुअल इवेंट मध्ये रियलमी एक्स7 सीरीज सोबतच स्वस्त Realme V3 5G फोन पण सादर केला आहे. रियलमी एक्स7 सीरीज बद्दल बोलायचे तर यात Realme X7Realme X7 Pro स्मार्टफोनने एंट्री घेतील आहे. Realme X7 सीरीज मध्ये सुपरफास्ट चार्जिंग, हाई रिफ्रेश रेट, टच सॅम्पलिंग रेट स्क्रीन आणि 5G कनेक्टिविटी सारखे प्रभावशील स्पेसिफिकेशन्स आहेत. दोन्ही फोन्सची डिजाइन एक सारखी आहे पण रॅम, स्टोरेज आणि कॅमेरा सेटअप मध्ये थोडा फरक आहे.

सुरवात करूया रियलमी एक्स7 व रियलमी एक्स7 प्रो च्या डिजाइन पासून. दोन्ही फोन्स फुल-व्यू पंच होल डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. फोन्स मधील होल-पंच डिस्प्ले वरच्या बाजूला डावीकडे आहे. रियलमी एक्स 7 मध्ये तिन्ही बाजूंना कमी बेजल्स आहेत. पण बॉटमला थोडा जाड बेजल दिसत आहे. तर रियलमी एक्स 7 प्रो मध्ये बॉटमला कमी बेजल देण्यात आला आहे. दोन्ही फोन्स मध्ये पावर ऑन-ऑफ बटन उजवीकडे आहे आणि वॉल्यूम रॉकर बटन डावीकडे आहे.

बॅक पॅनल पाहता दोन्ही फोन्स मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअप मध्ये तीन सेंसर वर्टिकल आहेत. तसेच त्याच्या बाजूला एक मॅक्रो सेंसर आणि त्या खाली एलईडी लाइट आहे. रियलमी एक्स 7 च्या मागे रियलमीची ब्रँडिंग डावीकडे खाली देण्यात आली आहे. तर रियलमी एक्स 7 प्रो च्या मागे उजवीकडे वर्टिकली मोठ्या अक्षरांत कंपनीची टॅग लाइन ‘Dare to Leap’ लिहिण्यात आली आहे.

दोन्ही फोन्स मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. कॅमेऱ्यातील अपर्चर मध्ये थोडा फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, X7 मध्ये अपर्चर f/2.3 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25 सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5 आणि Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45 सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

Realme X7 आणि Realme X7 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. पण दोन्ही फोन्सची बॅटरी 65W स्मार्ट प्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन्स फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. हि टेक्नॉलजी वोल्टेज कमी करून चार्जिंग पावर वाढवते आणि यात हीट पण कमी निर्माण होते. Realme X7 मध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि X7 Pro मध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. तसेच दोन्ही फोन्स सोबत टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्टँडर्ड 10V / 6.5A फ्लॅश चार्ज अडॅप्टर मिळतो.

Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले 90.8 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या स्क्रीन मध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे.

Realme X7 Pro मध्ये 6.55-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि सॅम्पलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. इतकेच नव्हे तर फोन मधील डिस्प्ले 91.6 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह येतात. तसेच फोन मध्ये 5th-जनरेशन कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात 1,200 निट्स ब्राईटनेस आहे.

रियलमी एक्स7 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Mediatek Dimensity 800U चिपसेट सह येतो. या चिपसेट मध्ये चार कॉर्टेक्स-ए 76 कोर आहेत आणि ग्राफिक्ससाठी GPU माली-G57 MC3 आहे. फोन मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. दुसरीकडे Realme X7 Pro मध्ये ऑक्टा-कोर Dimensity 1000+ SoC आणि 9-core Mali-G77 ग्राफिक प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8GB पर्यंतचा LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंतची USF 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

दोन्ही फोन्स एंडरॉयड 10 सह रियलमी यूआई वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन्सच्या दोन्ही सिम कार्ड्सवर 5जी, 4 जी एलटीई आहे तसेच फोन्स मध्ये डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वी 5.1, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. त्याचबरोबर जियोमॅग्नेटिक सेंसर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप आणि एक्सेलेरोमीटरचा समावेश पण आहे.

Realme X7 च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,799 (जवळपास 19,000 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 2,399 (जवळपास 25,600 रुपये) आहे. Realme X7 कंपनीने Haiyu Blue, C Color, आणि Fantasy White कलर मध्ये सादर केला आहे.

तर Realme X7 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटसाठी CNY 2,199 (जवळपास 23,400 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 2,499 (जवळपास 26,600 रुपये) आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 3,199 (जवळपास 34,300 रुपये) आहे. हँडसेट C Color, Fantasy White आणि Xingyu Black मध्ये विकला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here