Redmi 13 4G फोन 108MP कॅमेरा, 8GB रॅम, 5,030 mAh बॅटरीसह जागतिक स्तरावर लाँच, जाणून घ्या किंमत

शाओमीचा सब ब्रँड रेडमीने आपल्या नवीन बजेट स्मार्टफोनला जागतिक मार्केटमध्ये आणले आहे. हा Redmi 13 4G नावाने लाँच झाला आहे. डिव्हाईसमध्ये युजर्सना मीडियाटेक Helio G91 अल्ट्रा चिपसेट, 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 108 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, 8GB रॅम, 5030 एमएएच बॅटरी सारखे अनेक फिचर्स मिळत आहेत. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi 13 4G ची किंमत आणि उपलब्ध्ता (जागतिक)

 • Redmi 13 4G ला युरोपीय बाजारात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे.
 • डिव्हाईसच्या 6GB रॅम+ 128GB मेमरीची किंमत €179 म्हणजे जवळपास 16,133 रुपये आहे.
 • मोबाईलचा मोठा व्हेरिएंट 8GB रॅम+256GB स्टोरेज ऑप्शन €199.99 म्हणजे भारतीय चलनानुसार 18,026 रुपयांचा आहे.
 • Redmi 13 4G ब्लू, ब्लॅक आणि पिंक सारख्या तीन कलरमध्ये येतो.

Redmi 13 4G चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

 • 6.79-इंचाचा फुल HD+ पॅनल
 • हीलियो जी 91 अल्ट्रा चिपसेट
 • 8GB रॅम+ 256GB स्टोरेज
 • 108MP रिअर कॅमेरा
 • 13MP सेल्फी कॅमेरा
 • 5,030mAh बॅटरी
 • 33W फास्ट चार्जिंग
 • IP53 रेटिंग
 • अँड्रॉईड 14

डिस्प्ले: Redmi 13 4G मोबाईलमध्ये 6.79-इंचाचा IPS LCD फुल HD+ पॅनल देण्यात आला आहे. यावर 1800×2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 396ppi पिक्सल डेंसिटी, 90Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आला आहे.

प्रोसेसर: हा मिड बजेट स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी91 अल्ट्रा चिपसेटसह येतो. यात ग्राफिक्ससाठी माली जी 52 जीपीयू देण्यात आला आहे.

मेमोरी: डेटा सेव्ह करण्यासाठी हा मोबाईल 6GB, 8GB LPDDR4X RAM+ 128GB तसेच 256GB इंटरनल स्टोरेजसह आहे.

कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर LED फ्लॅशसह आहे. तसेच, सेल्फीसाठी 13MP चा कॅमेरा आहे.

बॅटरी: फोनला पावर देण्यासाठी 5,030mAh ची मोठी बॅटरी आणि याला चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

इतर: Redmi 13 4G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-सिम, 4G, WiFi 802.11 ac, ब्लूटूथ 5.3, पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP53 रेटिंग सारखे फिचर्स आहेत.

वजन आणि डायमेंशन: Redmi 13 4G डिव्हाईसचे डायमेंशन 168.6 × 76.28 × 8.17 मिमी आणि वजन 198.5 ग्रॅम आहे.

ओएस: ब्रँडने फोनला लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित HyperOS सह सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here