Xiaomi भारतात लॉन्च करेल 64MP कॅमेरा असलेला फोन, Realme ला मिळेल का टक्कर

Realme ने काही दिवसांपूर्वी अशी माहिती दिली होती कि ते आपला 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन 15 ऑगस्टला चीन मध्ये लॉन्च करेल. तसेच कंपनी भारतात 8 ऑगस्टला 64-मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप टेक्नॉलजी प्रदर्शित करा. आता रियलमीला टक्कर देत रेडमी ने बिजिंग मध्ये एका इवेंट मध्ये आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नोलॉजी सादर केली आहे.

रेडमी इंडिया ने आपला ऑफिशियल ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करून खुलासा केला आहे कि आम्हाला हे सांगताना अत्यानंद होत आहे कि रेडमी फोन लवकरच 64एमपी कॅमेरा सह सादर केला जाणार आहे. या क्वार्टर 4 मध्ये सादर केला जाईल. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि 64एमपी कॅमेरा असलेला पहिला रेडमी स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल.

कंपनीने फोनच्या नावाचा खुलासा केला नाही. तसेच फोन संबंधित इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आलेली नाही. पण कॅमेरा मधील सेंसरची माहिती देण्यात आली आहे. कंपनी यात सॅमसंग GW1 64MP सेंसर वापरणार आहे. 64एमपी मध्ये 48एमपी कॅमेरा पेक्षा 38 टक्के जास्त पिक्सल असतील. त्याचबरोबर कॅमेरा टेक्नोलॉजी बद्दल बोलायचे तर यात मोठा 1/1.7″ सेंसर, ISOCELL, स्मार्ट आईएसओ आणि हाईब्रिड 3डी एचडीआर क्षमता असेल.

64MP कॅमेर्‍याच्या शर्यतीत Realme शी होईल टक्कर

यावर्षी जून मध्ये रियलिमी ने आपल्या 64-मेगापिक्सल कॅमेरा फोन मधून घेतलेले काही फोटो शेयर करत म्हटले होते कि ते हा लवकरच लॉन्च करणार आहे. अलीकडेच रियलमीच्या या फोनची लॉन्च डेट पण समोर आली आहे ज्या नुसार हा फोन 8 ऑगस्टला दाखवला जाईल. तसेच ही अनोखी टेक्नोलॉजी दाखवल्या नंतर Realme आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन सादर करेल.

विशेष म्हणजे अलिकडेच Redmi ब्रँडने सांगितले होते कि कंपनी अश्या स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात MediaTek Helio G90T चिपसेट दिला जाईल. हा चिपसेट मीडियाटेक द्वारा लॉन्च केला गेलेला सर्वात नवीन चिपसेट आहे जो आक्टाकोर प्रोसेसेर सह चालतो. यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेले 2 Cortex-A76 कोर आणि 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणारे 6 Cortex-A55 कोर देण्यात आले आहेत.

तसेच कंपनीने घोषणा केली आहे कि Redmi Note 8 सीरीज वर काम करत आहे. या सीरीज मध्ये किती स्मार्टफोन मॉडेल असतील ही माहिती देण्यात आलेली नाही. पण Redmi Note 8 सीरीजचा खुलासा करण्यासोबतच कंपनीने असा पण दावा केला आहे की Redmi Note 8 स्मार्टफोन सीरीज मधील स्मार्टफोन के खूप पावरफुल असतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here