रेडमी आपली एंट्री-लेव्हल Redmi A2 सीरीज भारतात सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की या महिन्यात 19 मेला ए2 सीरीज सादर केली जाईल. भारतात येण्याआधी ह्या सीरीजमध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ बजेट फोन्स युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आशा आहे की भारतात देखील हे दोन्ही फोन्स येऊ शकतात. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही फोन्सची संभाव्य भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.
रेडमी ए2 सीरीजची किंमत (संभाव्य)
Xiaomi नं Redmi A2 सीरीजच्या किंमतीचा खुलुसा लाँचच्या दिवशी होईल. परंतु, एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरीज असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या सीरिजची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. विशेष म्हणजे स्मार्टफोन Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल
रेडमी ए2 आणि रेडमी ए2+ चे स्पेसिफिकेशन्स (युरोपियन व्हेरिएंट)
- 6.52” HD+ LCD Display
- MediaTek Helio G36 SoC
- 8MP+ QVGA Dual Camera
- 5MP Front camera
- 5000mAh Battery
Redmi A2 आणि Redmi A2+ दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600 x 720 पिक्सल) आणि अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोन्समध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंतची eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi च्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह QVGA सेकंडरी लेन्स मिळते. फोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅश आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या एंट्री लेव्हल फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी, 10W चार्ज आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड
Redmi A2 आणि Redmi A2+ लाइट ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन ड्युअल सिम, 4G, 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass, आणि Galileo ला सपोर्ट करतात. तसेच फोन Android 12 (Go Edition) वर चालतात. यातील फरक म्हणजे फक्त Redmi A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
