Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड

Highlights

  • शाओमी नंबर 1 वरून 4 वर आली आहे.
  • रियलमी टॉप 5 मध्ये शेवटच्या स्थानी आहे.
  • विवो आणि ओप्पोनं टॉप 3 मध्ये जागा बनवली आहे.

India Smartphone Market जगातील सर्वात मोठ्या मोबाइल बाजारातील एक आहे आणि त्यामुळे परदेशी कंपन्यांची यावर करडी नजर आहे. चीनी कंपनी Xiaomi प्रदीर्घ कालावधीपासून भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड होती परंतु आता साल 2023 कंपनीसाठी निराशाजनक ठरलं आहे. IDC च्या रिपोर्टनुसार शाओमी आता चौथ्या नंबरवर आली आहे तर Samsung नं नंबर 1 ची जागा पटकावली आहे.

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड कोणता?

आयडीसीच्या रिपोर्टनुसार सध्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग आहे. हा क्रमांक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या रिजल्टनुसार आहे. त्यानुसार जानेवारी-फेब्रुवारी-मार्च दरम्यान सॅमसंगनं 6.2 मिलियन स्मार्टफोन यूनिट्सची शिपमेंट केली आहे आणि त्यामुळे बाजारात कंपनीचा मार्केट शेयर 20.1% झाला आहे. जो इतर स्मार्टफोन ब्रँड्सच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

शाओमीनं गमावला पहिला नंबर

Xiaomi फॅन्ससाठी ही बातमी खूप निराशाजनक आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला होता तर यंदा पहिल्या तिमाहीत हा टॉप 3 मध्ये देखील टिकू शकला नाही. याआधी कंपनीनं 8.5 मिलियन शिपमेंटसह 23.4% मार्केट शेयर आपल्या नावे केला होता परंतु Q1 2023 मध्ये हा ब्रँड फक्त 5.0 मिलियन स्मार्टफोन यूनिट विकू शकला तसेच मार्केट शेयर 16.4% वर आला.

इंडियाचे टॉप 3 स्मार्टफोन ब्रँड

Samsung नं सर्वाधिक स्मार्टफोन विकत नंबर वनचा ताज आपल्या नावे केला आहे. तर चीनी ब्रँड Vivo तसेच OPPO नं सर्वांना धक्का देत चांगली कामगिरी केली आहे. Q2 2023 मध्ये हे दोन्ही ब्रँड टॉप 3 मधून बाहेर होते परंतु यंदा त्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. विवोचा मार्केट शेयर 17.7% तर ओप्पोचा मार्केट शेयर 17.6% झाला आहे.

realme ची परिस्थिती वाईट

इंडियन स्मार्टफोन मार्केटच्या ह्या रिपोर्टमध्ये रियलमीची अवस्था सर्वात खराब आहे. ही कंपनी गेल्यावर्षी 16.4% मार्केट शेयरसह भारतातील टॉप 3 स्मार्टफोन ब्रँड्समध्ये होती परंतु यंदाच्या पहिल्या तिमाहीत ह्याचा मार्केट शेयर फक्त 9.4% राहिला आहे. वर्षाच्या सुरवातीच्या तीन महिन्यांत realme नं फक्त 2.9 मिलियन स्मार्टफोन यूनिट विकले आहेत आणि आता पाचव्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here