80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल

Highlights

  • Vivo S17 स्मार्टफोन लाँचपूर्वीच दिसला वेबसाइटवर
  • V2283A मॉडेल नंबरसह करण्यात आला लिस्ट
  • भारतात विवो वी29 नावानं केला जाऊ शकतो लाँच.

चिनी स्मार्टफोन ब्रँड विवो आपल्या नवीन फोन मॉडेल Vivo S17 वर काम करत आहे. हा फोन चायनीज सर्टिफिकेशन वेबसाइट 3C वर लिस्ट झाला आहे. आलेल्या बातमीनुसार हा फोन कंपनी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर करू शकते. ह्या नवीन स्मार्टफोन लाइनअपमध्ये Vivo S17 सोबतच Vivo S17e आणि Vivo S17 Pro चा समावेश केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अंदाज लावला जात आहे की Vivo S17 भारतात Vivo V29 नावानं सादर केला जाऊ शकतो.

विवो एस17 फास्ट चार्जिंग सपोर्ट

Vivo S17 स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशनवर मॉडेल नंबर V2283A सह लिस्ट करण्यात आला आहे. चायना कंप्लसरी सर्टिफिकेट (CCC अर्थात 3C) ही एजेंसी चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना विक्रीपूर्वी सेफ्टी सर्टिफिकेट देते. हे देखील वाचा: OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच

Vivo S17 स्मार्टफोन 3C च्या वेबसाइटवर कंपनीच्या चार्जर मॉडेल नंबर V8037L0A0-CN, V8037L0B0-CN, आणि V8037L0D0-CN सह लिस्ट करण्यात आला आहे. ह्या चार्जरचा पावर आउटपुट 10W (5V/2A), 18W (9V/2A), आणि 80W (11V/7.3A) आहे. असा आहे त्यामुळे Vivo S17 स्मार्टफोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाईल, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं Vivo S17 फोनची फास्ट चार्जिंग सुधारली आहे.

विवो एस17 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 1.5K OLED Display
  • Qualcomm Snapdragon 778G

Vivo S सीरीजच्या आगामी Vivo S17 स्मार्टफोनमध्ये 1.5K OLED डिस्प्ले पॅनल दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. Vivo S17 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह लाँच केला जाईल.

  • 12GB RAM, 256GB Storage
  • Android 13

विवोचा हा अपकमिंग स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 256GB स्टोरेज, आणि 12GB रॅम + 256GB आशा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा फोन लेटेस्ट Android 13 OS वर आधारित कंपनीच्या कस्टम युआयवर चालेल. हे देखील वाचा: Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड

  • 80W Fast Charging
  • 50MP Camera

अपकमिंग Vivo S17 स्मार्टफोनबद्दल चर्चा आहे की हा 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह मार्केटमध्ये येऊ शकतो. फोटोग्राफी पाहता Vivo S17 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766V चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS)ला सपोर्टसह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here