शाओमीने मागे मिडरेंज सेगमेंट मध्ये अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. तसेच अलीकडेच कंपनीने भारतीय बाजारात आपला Mi 10i स्मार्टफोन 108MP कॅमेऱ्यासह सादर केला. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी Redmi Note 10 सीरीज आणण्यासाठी तयार आहे. Redmi Note 10 Pro मॉडेल नंबर M2101K6G सह FCC वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे त्यामुळे वाटत आहे कि फोन लवकरच बाजारात येईल. लिस्टिंग सर्वप्रथम टेक वेबसाइट MySmartPrice ने बघितली होती.
भारतात होईल लॉन्च
तसेच अतिरिक्त स्मार्टफोन भारत सरकारच्या एजेंसी C-DOT च्या CEIR IMEI वेबसाइट वर पण दिसला आहे त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi Note 10 Pro भारतात पण लॉन्च होणार आहे. दुर्दैवाने Redmi Note 10 Pro बाबत सध्या जास्त माहिती समोर आली नाही.
FCC लिस्टिंग
एफसीसी लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि रेडमी नोट 10 प्रो अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम MIUI 12 वर चालेल. तसेच फोनचे तीन वेरिएंट-6GB + 64GB, 6GB + 128GB, आणि 8GB + 128GB असतील. समोर आले आहे कि Redmi Note 10 Pro डुअल-बॅंड, वाय-फाय, एफएम रेडियो, ब्लूटूथ आणि 4जी एलटीई कनेक्टिविटी सह येईल. आशा आहे आहे कि फोनचा 5G मॉडेल पण येईल.
स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी लीक मध्ये सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 मध्ये मीडियाटेक चिपसेट मिळू शकतो आणि यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. डिवाइस मध्ये रियर पॅनल वर क्वॉड कॅमेरा सेटअप असू शकतो. पावरफुल प्रो मॉडेल मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G आणि 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर असू शकतो. लीक्सनुसार दोन्ही स्मार्टफोन्स पावरफुल कॅमेरा परफॉर्मन्स सह येतील.
Mi 10i
Xiaomi ने मंगळवारी देशात बहुप्रतीक्षित Mi 10i स्मार्टफोन लॉन्च केला. Mi 10i च्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरियंट 21,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरियंट 23,999 रुपयांमध्ये येतो.