Xiaomi ने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या ‘रेडमी नोट 13’ सीरिज अंतर्गत Redmi Note 13R Pro चीनमध्ये सादर केले होते, जो 108MP Camera आणि 12GB RAM च्या ताकदीसह आला होता. तसेच आज कंपनी या मोबाईलचे छोटे व्हर्जन Redmi Note 13R पण चीनमध्ये लाँच केले आहे. हा एक मिड बजेट मोबाईल फोन आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Redmi Note 13R चे स्पेसिफिकेशन
- 6.79″ एफएचडी+ 120 हर्ट्झ स्क्रीन
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2
- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
- 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
- 33 वॉट 5,030 एमएएच बॅटरी
स्क्रीन : Redmi Note 13R 2460 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.79 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही एलसीडी पॅनलवर बनलेली स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 550nits ब्राईटनेसला सपोर्ट करते.
प्रोसेसर : रेडमीने आपल्या नवीन नोट फोनला HyperOS वर सादर केले आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 4 Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3GHz क्लॉक स्पीडवर चालतो.
मेमरी : नोट 13 आर 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच झाला आहे. यामध्ये 128GB, 256GB तसेच 512GB स्टोरेज मिळते. हा मोबाईल LPDDR4X RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेली 50MP ultra-clear मेन लेन्स देण्यात आली आहे जी 2MP macro सेन्सरसह मिळून चालते. तसेच Redmi Note 13R मध्ये 8MP Selfie कॅमेरा आहे.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi Note 13R 5G फोन 5,030mAh Battery ला सपोर्ट करते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
इतर फिचर्स : रेडमी नोट 13 आर 3.5mm हेडफोन जॅकला सपोर्ट करतो. हा IP53 रेटिंगसह आला आहे. यात ब्लूटूथ, वायफाय सारखे बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर्स आहेत. या मोबाईलची जाडी 8.32mm आहे.
Redmi Note 13R किंमत
रेडमी नोट 13 आर चीनच्या वेबसाईटवर एकूण 5 व्हेरिएंट्समध्ये लिस्ट झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 6GB RAM + 128GB Storage देण्यात आले आहे ज्याची किंमत 1399 युआन म्हणजे 16,399 रुपयांच्या आसपास आहे. तसेच मोबाईलचा मोठा 12GB RAM + 512GB Storage व्हेरिएंट 2199 युआन मध्ये लाँच झाला आहे जो भारतीय चलनानुसार 25,799 रुपयांच्या आसपास आहे.
रेडमी नोट 13 सीरिजची किंमत
Redmi Note 13 ची किंमत
6GB RAM + 128GB Storage = ₹16,999
8GB RAM + 256GB Storage = ₹18,999
12GB RAM + 256GB Storage = ₹20,999
Redmi Note 13 Pro ची किंमत
8GB RAM + 128GB Storage = ₹24,999
8GB RAM + 256GB Storage = ₹26,999
12GB RAM + 256GB Storage = ₹28,999
Redmi Note 13 Pro+ ची किंमत
8GB RAM + 256GB Storage = ₹30,999
12GB RAM + 256GB Storage = ₹32,999
12GB RAM + 512GB Storage = ₹34,999