शाओमी आपल्या रेडमी नोट 14 सीरीजवर काम करत आहे. यात Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ सारखे मॉडेल येऊ शकतात. परंतु ब्रँडने घोषणा केली नाही, मात्र डिव्हाईस सर्टिफिकेशनमध्ये दिसला आहे. ज्यामुळे लवकर लाँच होऊ शकतो. सध्या एक मॉडेल 3C साईटवर दिसला आहे. चला, पुढे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
Redmi Note 14 3 सी लिस्टिंग
- गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार कथित Redmi Note 14 फोन 3C सर्टिफिकेशन साईटवर स्पॉट झाला आहे. ज्याचे मॉडेल नंबर 24090RA29C आहे.
- 3 सी सर्टिफिकेशन साईटवरून माहिती मिळाली आहे की आगामी Redmi Note 14 मध्ये 45W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
- 3C सर्टिफिकेशनवर फक्त इतकीच माहिती समोर आली आहे. परंतु येथे आल्यानंतर याची लवकर लाँचची शक्यता आहे.
Redmi Note 14 सीरीज लाँच टाईमलाईन (लीक)
पूर्व रिपोर्टनुसार अंदाज होता की रेडमी नोट 14 सीरीज सप्टेंबर पर्यंत लाँच होऊ शकते, परंतु टिपस्टर अभिषेक यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये सांगितले की हा लाईनअप या महिन्याच्या शेवटी पर्यंत चीनमध्ये येऊ शकतो. तसेच, चीनमध्ये आल्यानंतर फोनला भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री दिली जाऊ शकते.
Redmi Note 14 सीरीजची माहिती (संभाव्य)
- लीकनुसार Redmi Note 14 ला संभवतः Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ सह लाँच केले जाऊ शकते. हे पण सांगण्यात आलं आहे की प्रो प्लस मध्ये कर्व-एज डिझाईन मिळणार असल्याची संभावना आहे.
- Redmi Note 14 Pro+ मध्ये OLED डिस्प्ले सादर केला जाऊ शकतो. फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.
- आगामी Redmi Note 14 हाय रिफ्रेश रेटसह 1.5K AMOLED डिस्प्लेसह सादर होऊ शकतो.
- रिपोर्टनुसार प्रो मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 3 SoC दिला जाऊ शकतो. तर Pro+ व्हेरिएंट मध्ये MediaTek Dimensity 7350 चिपसेट मिळू शकतो.
- येत्या Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ दोन्ही मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार असल्याची आशा आहे.
- Redmi Note 14 सीरीज स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळणार असल्याची शक्यता आहे.