Categories: बातम्या

शाओमीची भेट : 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 9 Pro Max लॉन्च, रियलमी 6 प्रो ला मिळेल टक्कर

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आज आपल्या सब-ब्रँड रेडमीच्या आत रेडमी 9 सीरीज सादर केला आहे. या सीरीज मध्ये रेडमी 9 आणि रेडमी 9 प्रो मॅक्स सादर केला आहे. दोन्ही फोनच्या डिजाइन मध्ये कोणताही फरक नाही. पण स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत थोडे वेगळे आहेत. चला जाणून घेऊया रेडमी नोट 9 प्रो मॅक्स बाबत सर्वकाही.

डिजाइन

Redmi Note 9 Pro Max कंपनीने Aura बॅलेंस डिजाइन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल विषयी बोलायचे तर हा पंच होल सह सादर केला गेला आहे जो फोनच्या मधोमध आहे. तसेच बॉटम सोडून फोनचा डिस्प्ले खूप कमी बेजल्स सह येतो. डिवाइसच्या बॉटमला थोडा जाड बेजल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल्स आहे.

तसेच उजवीकडे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो पावर बटणचे काम करेल. त्याच्यावर वॉल्यूम रॉकर बटण आहे. डावीकडे सिम-कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. आता बोलूया फोनच्या बॅक पॅनल बाबत. डिवाइस मध्ये तुम्हाला चौकोनी क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याच्या खाली एलईडी फ्लॅश लाइट आहे. तसेच मागे रेडमीची ब्रॅण्डिंग दिसत आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात रियर वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. फोनच्या बॉक्स मध्ये पण 33 वॉटचा चार्जर आहे.

या फोन मध्ये कंपनीने नाविक सपोर्ट दिला आहे. नाविक भारताची सॅटेलाइट नेविगेशन सिस्टम आहे. जशी अमेरिकेकडे जीपीएस आहे, रशियाकडे ग्लोनॉस आहे, यूरोप कडे गॅलीलियो आहे, चीन कडे बायडू (BeiDou) नेविगेशन सिस्टम आहे, तशीच भारताकडे नाविक (NavIC) आहे. नाविक नेविगेशनच्या माध्यमातून पाच मीटर पर्यंत अचूक माहिती मिळवता येईल.

किंमत आणि सेल

Redmi Note 9 Pro Max च्या 6GB रॅम व 64GB स्टोरेजची किंमत 14,999 रुपये, 6GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये, 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. या डिवाइसची विक्री 25 मार्चला मी.कॉम आणि अमेझॉन वर होईल. तसेच डिवाइस मी होम वर पण सेलसाठी 25 मार्चला उपलब्ध केला जाईल. फोन लवकरच ऑफलाइन सेलसाठी सादर केला जाईल.

Published by
Siddhesh Jadhav