शाओमीच्या स्मार्टर लिविंग कार्यक्रमामध्ये नवीन टॅबलेट Redmi Pad SE भारतात लाँच झाला आहे. हा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे ज्यात बेस मॉडेलची सुरुवात मात्र 12,999 रुपयांनी होत आहे. नवीन टॅबमध्ये तुम्हाला 11-इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 8,000mAh बॅटरी, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, 8MP कॅमेरा सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे याची वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.
Redmi Pad SE ची किंमत आणि उपलब्धता
- Redmi Pad SE च्या 4GB रॅम +128GB मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे.
- टॅबलेट 6GB रॅम +128GB स्टोरेज ऑप्शनसह 13,999 रुपयांमध्ये मिळेल.
- टॉप मॉडेल 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 14,999 रुपयांचा आहे.
- हा टॅबलेट ग्रॅफाइट ग्रे आणि लव्हेंडर पर्पल सारख्या दोन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
- लाँच ऑफर अंतर्गत कंपनी ICICI कार्ड सह 1,000 रुपयांचा इंस्टंट बँक डिस्काऊंट देत आहे.
- ब्रँडने Redmi Pad SE चा कव्हर पण बाजारात आणला आहे ज्याची किंमत 1,299 रुपये आहे.
- नवीन रेडमी टॅबलेट 24 एप्रिलपासून Amazon, Flipkart, Xiaomi वेबसाईट आणि Xiaomi रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध होईल.
Redmi Pad SE चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Redmi Pad SE मध्ये 11-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यात 1920×1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 400 निट्स ब्राइटनेस, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 84.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो.
- प्रोसेसर: टॅबलेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर लावला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू आहे.
- स्टोरेज: मेमरी सेव्ह करण्यासाठी हा तीन स्टोरेजमध्ये येतो. ज्यात 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड पण देण्यात आले आहे.
- कॅमेरा: नवीन रेडमी टॅबमध्ये f/2.3 अपर्चरसह 8MP चा बॅक कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा कॅमेरा लावला आहे.
- बॅटरी: Redmi Pad SE मध्ये जबरदस्त 8,000mAh ची मोठी बॅटरी आहे. यात 10W चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
- इतर आणि कनेक्टिव्हिटी: टॅबमध्ये वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाईप-सी पोर्ट, डॉल्बी अॅटमॉस आणि स्टीरियो स्पिकर सारखे अनेक पर्याय आहेत.
- ओएस: Redmi Pad SE टॅबलेट अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14 वर आधारित ठेवला गेला आहे.
- डायमेंशन: टॅबलेटचे डायमेंशन 255.53mm x 167.08mm x 7.36mm आहे.















