Jio देत आहे इंटरनेट सोबत 4K LED TV आणि Setup Box अगदी Free

Reliance Industries ने आज आपल्या 42व्या एनुअल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून देशवासियांना अनेक चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. कंपनीने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्यात Jio GiGaFiber आणि Jio set top box चा पण समावेश आहे. Jio चा इतिहास आहे जेव्हा कंपनीने आपली एखादी नवीन सर्विस बाजारात आणते तेव्हा सुरवातीला मोफत देण्यात येते. कंपनीने सर्वात आधी फ्री मध्ये इंटरनेट डेटा व वॉयस कॉलिंग सर्विस दिली तर नंतर कंपनीने JioPhone पण मोफत दिला. तर आज भारतीयांना जबरदस्त भेट देत Jio ने घोषणा केली आहे कि कंपनी आता आपल्या यूजर्सना 4K LED TV पण मोफत देईल.

Reliance Jio ने आपली सुपर फास्ट इंटरनेट ब्रॉडबँड सर्विस Jio Fiber अधिकृतपणे लॉन्च केली आहे. हि सर्विस येत्या 5 सप्टेंबर पासून देशात सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होईल. या सर्विस सोबतच Jio ने सांगितले कि जे यूजर्स कंपनीची ब्रॉडबँड सर्विस घेतील त्यांना कंपनी कडून वेलकम ऑफर अंतर्गत एक 4K LED TV आणि एक Jio Setup Box मोफत देईल.

अशी आहे ऑफर

Reliance Jio HD/4K LED TV आणि 4K Setup Box कंपनीच्या Jio Fiber ब्रॉडबँड सह मोफत देत आहे. म्हणजे Jio Fiber विकत घेतल्यास यूजर्सना टेलीविजन आणि सेटअप बॉक्स मोफत मिळवण्याची संधी मिळेल. कंपनीच्या स्कीम अंतर्गत जियो फाइबरचा वार्षिक प्लान घेतल्यास यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या या प्लानचे नाव ‘Jio Forever Annual Plan’ असे ठेवले आहे.

प्लानची माहिती

कंपनीने Jio Fiber च्या प्लानची बेसिक किंमत 700 रुपये प्रतिमाह ठेवली आहे. तर Jio Fiber चा सर्वात मोठा प्लान 10,000 रुपये प्रतिमाहचा आहे. Jio Fiber चा कोणताही प्लान संपूर्ण वर्षभरासाठी एकसाथ घेतल्यास कंपनीकडून यूजर्सना HD/4K LED TV आणि 4K Setup Box मोफत दिला जाईल. टीवी आणि सेटअप बॉक्स साठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

उदाहरणार्थ जर तुम्ही आपल्या Jio Fiber चा 700 रुपयांचा प्लान Jio Forever Annual Plan सह घेतला तर तुम्हाला वर्षभरासाठी एकूण 8,400 रुपये द्यावे लागतील. या 8,400 रुपयांमध्ये तुम्हाला Jio Fiber + HD/4K LED TV + 4K Setup Box मिळेल. म्हणजे एका सर्विसच्या किंमतीत दोन इतर सर्विसेसचा लाभ मोफत घेता येईल.

विशेष म्हणजे Jio Fiber च्या 700 रुपये प्रतिमाह वाल्या प्लान मध्ये यूजर्सना 100एमबीपीएस च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळेल. तसेच कंपनीच्या सर्वात मोठ्या 10,000 रुपयांच्या प्लान मध्ये 1जीबीपीएस च्या स्पीडने इंटरनेट डेटा दिला जाईल. Jio Fiber सोबत यूजर्सना अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट, मल्टी पार्टी वीडियो कॉन्फ्रेंसिंग सारख्या सर्विसेज मिळतील. तसेच टीवी सेटअप बॉक्स मध्ये तुम्ही आपल्या टीवी स्क्रीन वर अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंटची मजा घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here