टेलीकॉम विश्वात हलचल निर्माण केल्यानंतर रिलायंस जियो ने मोबाईल बाजारात आली होती आणि जियोफोन लॉन्च केला होता. देशातील पहिला 4जी फीचर फोन सादर केल्यानंतर कंपनी ने जियोफोन 2 पण गेल्यावर्षी लॉन्च केला आहे. 2017 मध्ये जियोफोनआणल्यानंतर रिलायंस जियोने कोणताही दीर्घ वैधता असलेला प्लान आणला नव्हता जो जियोफोन वर लागू होईल. तर आता जियोफोन यूजर्सना खुश करत जियोने 2 नवीन प्लान्स सादर केले आहेत जे दीर्घ वैधतेसह येतात.
रिलायंस जियो ने 594 आणि 297 रुपये असे दोन प्लान सादर केले आहेत जे फक्त जियोफोन यूजर्स साठी आहेत. जियोचे हे दोन्ही नवीन प्लान जुन्या जियोफोन आणि जियोफोन 2 दोन्ही वर लागू होतात. कंपनीने 594 रुपयांचा प्लान 168 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे तर जियोचा 297 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. चला एक नजर टाकूया या दोन्ही प्लान्स मध्ये मिळणाऱ्या फायद्यांवर :
जियोफोन 594 रुपये
जियोचा 594 रुपयांचा प्लान 168 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान अंतर्गत रोज 500एमबी डेटा मिळतो ज्याचा वापर 4जी स्पीडने केला जाऊ शकतो. दिवसाचा 500एमबी डेटा संपल्यावर 64केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी 300एसएमएस मिळतील ज्यांचा नॅशनल वापर केला जाऊ शकतो. 28 दिवस पूर्ण होताच पुन्हा 300एसएमएस मिळतील.
जियोफोन 297 रुपये
जियो ने 297 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह आणला आहे. या प्लान मध्ये पण रोज 500एमबी 4जी डेटा मिळेल. 500एमबी ची दैनिक लिमिट पूर्ण झाल्यावर 64केबीपीएस स्पीडने इंटरनेट चालेल. जियो या प्लान मध्ये पण 28 दिवसांसाठी 300एसएमएस देत आहे जे 29व्य दिवशी रिफिल होतील. टेलीकॉम बाजाराबद्दल बोलायचे तर 297 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता इतर कोणीच देत नाही.
विशेष म्हणजे जियोने 99 रुपयांचा प्लान आधीच सादर केला आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो जो संपूर्ण महिन्यात एकूण 14जीबी 4जी डेटा देतो. या प्लान मध्ये रोज 500एमबी डेटा क्रेडिट होतो. जियोने आणेलेल्या 594 रुपये आणि 297 रुपये वाले हे दोन्ही प्लान 99 रुपये वाले प्लानचीच बंडल ऑफर आहे. या नवीन प्लानमुळे जियोफोन यूजर्सना होणार फायदा म्हणजे त्यांना दार महिन्याला रिचार्ज करावा लागणार नाही. एकदाच रिचार्ज करून तीन महिने विसरून जायचं.















