जियो, एयरटेल, वोडाफोन, आइडिया : 400 रुपयांमध्ये येणारे सर्वात बेस्ट प्लान

भारतातील टेलीकॉम इंडस्ट्री आपल्या यूजर्सना आकर्षित करण्याचे भरमसाठ प्रयत्न करत आहे. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त फायदे देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. एयरटेल, रिलायंस जियो, वोडाफोन, आइडिया व बीएसएनएल सर्व कंपन्यांनी कमी किंमतीसह जास्त व्हॅलिडिटी असलेले प्लान्स बाजारात आणले आहेत. त्यांच्या प्लान्स मध्ये ग्राहकांचा गोंधळ उडू शकतो कि कोणत्या कंपनीचा कोणता प्लान निवडावा. तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही सर्व कंपन्यांच्या प्लानचा तुलनात्मक रिपोर्ट बनवला आहे ज्यात 400 रुपयांच्या आसपास किंमतीत येणाऱ्या प्लान्सचा समावेश केला आहे. इथून तुम्ही तुम्हचा वापर आणि आवड या नुसार तुमच्यासाठी बेस्ट प्लान निवडू शकता.

एयरटेल

एयरटेल ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 399 रुपयांचा प्लान आणला आहे. हा प्लान 70 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. इंटरनेट डेटा पाहता एयरटेल या प्लान मध्ये रोज 1.4 जीबी डेटा देत आहे. या हिशोबाने ग्राहकांना 70 दिवसांसाठी एकूण 98जीबी डेटा मिळेल. या डेटाचा वापर 4जी सह 3जी नेटवर्क वर पण केला जाऊ शकतो. या प्लान मध्ये कंपनी संपूर्ण व्हॅलिडिटी साठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. या वॉयस कॉलचा वापर सर्व लोकल व एसटीडी कॉलिंग सह रोमिंग मध्ये पण फ्री असतो. तसेच प्लान मध्ये कंपनी रोज 100 एसएमएस पण देत आहेत.

रिलायंस जियो

जियो ने पण 399 रुपयांचा एक प्लान आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो. डेटा पाहता जियो आपल्या ग्राहकांना रोज 1.5जीबी डेटा देत आहे. म्हणजे 399 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 126 जीबी इंटरनेट डेटा मिळेल जो 4जी स्पीड वर वापरता येतो. रोजचा 1.5जीबी डेटा संपल्यास युजर 64केबीपीएस स्पीडने इंटरनेट वापरू शकतील. तसेच या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल मोअफाट मिळतात जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. तसेच जियोच्या या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण देईल.

आइडिया

आइडिया ने पण आपल्या प्रीपेड यूजर्स साठी 398 रुपयांचा एक प्लान सादर केला आहे जो एयरटेल च्या 399 रुपयांच्या प्लान सारखा आहे. हा प्लान पण 70दिवसांच्या वैधते सह येतो. आइडिया च्या या प्लान मध्ये रोज 1.4 जीबी डेटा मिळतो. म्हणजे ग्राहकांना 70 दिवसांत एकूण 98जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर कंपनी या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहेत. या वॉयस कॉलचा वापर लोकल व एसटीडी कॉलिंग सह रोमिंग मध्ये पण फ्री असतील. तसेच प्लान मध्ये कंपनी रोज 100 एसएमएस पण देईल.

वोडाफोन

वोडाफोन ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 458 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान 84​ दिवसांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये कंपनी रोज 2.8जीबी 4जी डेटा देत आहे. वोडाफोन ची किंमत इतर कंपन्यांपेक्षा जास्त आहे पण हि कंपनी डेटा पण इतरांपेक्षा जास्त म्हणजे एकूण 235.2जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे. प्लान मधील इतर फायदे पाहता यात अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. तसेच कंपनी या प्लान मध्ये एका दिवसासाठी 100 एसएमएस देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here