आपल्या मोफत सेवा आणि स्वस्त प्लान्स ने देशातील टेलीकॉम इंडस्ट्री ची रूपरेषा बदलणारी रिलायंस जियो भारतीय इंटरनेट बाजारच्या मोठ्या हिस्स्यावर अधिराज्य करत आहे. मोबाईल डाटा प्लान्स सोबतच कंपनी ने डॉन्गल सर्विस पण जियोफाई च्या रुपात सादर केली आहे. फास्ट स्पीड इंटरनेट देणार्या जियोफाई साठी जियो ने खुपच शानदार आॅफर सादर केली आहे. या आॅफर अंतर्गत जियोफाई फक्त 499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
रिलायंस जियो ने जियोफाई वर नवीन आॅफर ची सुरवात केली आहे ज्या अंतर्गत 999 रुपयांचा हा सुपर फास्ट इंटरनेट डिवाईस फक्त 499 रुपयांमध्ये मिळू शकतो. जियोफाई च्या खरेदी वर जियो 500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या कॅशबॅक आॅफर मध्ये जियोफाई सोबतच जियो या डिवाईस मध्ये वापरण्यासाठी यूजर्सना पोस्टपेड सिम पण देत आहे.
जियो कडून 500 रुपयांचा कॅशबॅक मिळण्यासाठी पोस्टपेड सिम जियोफाई मध्ये वापरावा लागेल. 12 महीने सलग जियो पोस्टपेड सिम आणि जियोफाई एक साथ वापरल्यास कंपनी एक वर्षानंतर 500 रुपयांचा क्रेडिट बॅलेंस यूजर्सना देईल. या क्रेडिट बॅलेंस चा वापर जियोफाई च्या बिल सोबत करता येईल आणि यूजर्स ने नवीन प्लान ने रिचार्ज केल्यास आपोआपच त्या प्लान ची किंमत या 500 रुपयांमधून कट होईल
जियोफाई मधील पोस्टपेड सिम ला यूजर्सना जियो चा 199 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लान अंतर्गत यूजर्सना कोणत्याही दैनिक वैधते विना 4जी इंटरनेट डाटा दिला जाईल. तसेच जियोफाई वरून इंटरनेशनल कॉल साठी 50 पैसे प्रति मिनिट या दराने शुल्क द्यावे लागेल. जियो कडून मिळणारी जियोफाई आॅफर ची सुरवात आज म्हणजे 3 जुलै पासून झाली आहे. विशेष म्हणजे जियो ने 90 मिनिटांत जियोफाई घरी पोचविण्याचा शब्द दिला आहे.















