अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung आपल्या गॅलेक्सी A सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन Galaxy A10s वर काम करत आहे. या स्मार्टफोन बद्दल मागील काही दिवसांत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन वाई-फाई अलायंस, अमेरिकी वेबसाइट एफसीसी आणि थायलंड सर्टिफिकेशन्स अथॉरिटी एनबीटीसी वर पण लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आता 91मोबाईल्सला या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.
91मोबाईल्सला हि माहिती सॅमसंगच्या एका एक्जिक्यूटिव कडून मिळाली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले आहे कि प्रोडक्ट ट्रेनिंग झाली आहे आणि जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरवातीला भारतात हा लॉन्च केला जाऊ शकतो. भारतीय बाजारात या फोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होईल.
Samsung Galaxy A10s च्या कॅमेरा आणि बॅटरी संबंधित माहिती आधीच आली होती आणि आता याची स्क्रीन साइज पण समजली आहे. त्याचबरोबर प्रोसेसरची पण माहिती त्यांनी दिली आहे. Galaxy A10s मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. हा फोन 2जीबी रॅम वेरियंट सह उपलब्ध होईल.
स्पेसिपिकेशन्स
आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहिती नुसार Samsung Galaxy A10s मध्ये 1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर असेल. हा गीकबेंच वर 2.0 गीगाहट्र्जच्या प्रोसेसर सह लिस्ट केला गेला होता. परंतु लॉन्च मॉडेल वेगळ्या प्रोसेसर सह येऊ शकतो. फोन मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. इतकेच नाही तर फोनची स्टोरेज यूजर्स माइक्रोएसडी कार्डने वाढवू शकतात.
तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे डुअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. मागे 13-मेगापिक्सल सह 2-मेगापिक्सलचा कॅमेरा कॉम्बिनेशन असेल. डिवाइस मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.
पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. फोन एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. तसेच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स असतील. एकंदरीत हा फोन Samsung Galaxy A10 चे नवीन वर्जन असेल.














