Samsung Galaxy A16 5G हुआ ग्लोबली लाँच, सोबत मिळतील 6 वर्षाचे ओएस अपडेट

सॅमसंगने अधिकृत स्तरावर ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट करत लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A16 5G लाँच केला आहे. हा या सेगमेंटचा पहिला डिव्हाईस आहे जो 6 वर्षाचे अँड्रॉईड अपडेट आणि सहा वर्षाच्या सुरक्षा पॅच सह आला आहे. म्हणजे तुम्ही फोन खरेदी केल्यावर 6 वर्षापर्यंत लेग फ्री अनुभव घेऊ शकतील. त्याचबरोबर मोबाईल 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 6.7 इंचाचा मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले सारख्या अनेक वैशिष्ट्यांसह आहे. चला, पुढे तुम्हाला याची संपूर्ण माहिती देत आहोत.

Samsung Galaxy A16 5G ची डिझाईन

फोनची डिझाईन पाहता डिव्हाईसमध्ये बॅक पॅनलवर ब्रँडचे अनेक मोबाईल प्रमाणे वर्टिकली ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे. यात एलईडी फ्लॅश पण देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच डिझाईन मिळते. हा फ्लॅट पॅनलवर बनलेला स्मार्टफोन आहे याची थिकनेस 7.9mm आहे. डिव्हाईसच्या उजव्या साईडवर पावर आणि वॉल्यूम बटन आहे. तसेच, बॅक पॅनलच्या खालच्या बाजूला ब्रँडिंग पाहिले जाऊ शकते. तसेच Samsung Galaxy A16 5G च्या रंग पर्याया मध्ये ब्लू ब्लॅक, लाइट ग्रे, गोल्ड आणि लाइट ग्रीनचा समावेश आहेत.

Samsung Galaxy A16 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Samsung Galaxy A16 5G मोबाईलमध्ये 6.7 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे पिक्सल रिजॉल्यूशन फुल HD+ 1080 x 2340 चे आहे तसेच 90Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • चिपसेट: सॅमसंगनं आपल्या ऑक्टा-कोर चिपसेट बाबत सांगण्यात आले आहे, जो 2.4GHz च्या पीक स्पीडवर चालतो. हा Exynos 1330 सह असू शकतो.
  • स्टोरेज आणि रॅम: चांगले स्पीड आणि स्पेससाठी सॅमसंगने 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रदान केले आहे. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये इतर मेमरी पर्याय पण येऊ शकतात. जर 128GB स्टोरेज तुमच्यासाठी कमी आहे तर मायक्रो SD कार्ड स्लॉट पण देण्यात आले आहे. ज्यामुळे 1.5TB पर्यंत क्षमता वाढविली जाऊ शकते. तसेच कार्ड स्लॉट दुसऱ्या सिम सह देण्यात आले आहे. यामुळे जर तुम्ही मायक्रोएसडी कार्डचा उपयोग कराल तर दोन सिम कार्ड जोडू शकत नाही.

  • कॅमेरा: Samsung Galaxy A16 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात 50MP चा प्रायमरी, 5MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फीसाठी 13MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: हा लेटेस्ट फोन 5,000mAh ची बॅटरीसह आहे. याला USB टाईप-C 2.0 पोर्टच्या माध्यमातून 25W च्या स्पीडने चार्ज केले जाऊ शकते. कंपनी 18 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक आणि वाय-फाय वर 16 तासांपर्यंत इंटरनेट वापर करण्याचा वादा करत आहे.
  • इतर: डिव्हाईस 4G आणि 5G सेलुलर नेटवर्क सह येतो. यात वाय-फाय 5, वाय-फाय डायरेक्ट, ब्लूटूथ v5.3, NFC, GPS सारखे अनेक पर्याय आहेत. हेच नाही तर पाणी आणि धूळीपासून वाचणारे IP54 रेटिंग आणि फिंगरप्रिंट सेन्सर पण आहेत.

Samsung Galaxy A16 5G की किंमत

कंपनीने Samsung Galaxy A16 5G ला अधिकृत स्तरावर आपल्या डच वेबसाईटवर लिस्ट केले आहे. परंतु याची किंमत येण्यासाठी वेळ आहे. आशा आहे की हा भारतासह इतर मार्केटमध्ये पण लवकर येऊ शकतो. फोनची किंमत भारतीय चलनानुसार 15,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here